IPL 2022 | MI vs DC Saam TV
Sports

IPL 2022: मुंबईच्या हातात दोन बलाढ्य संघांचे नशिब, प्लेऑफमध्ये कोण जाणार?

मुंबईच्या संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाहीये.

Pravin

आयपीएलच्या (IPL 2022) हंगामात आज सामना नाहीतर युद्ध रंगणार आहे. सामना एक असणार आहे परंतु नशिब दोन संघ आजमवणार आहेत. दिल्लीच्या संघाचे नशिब त्यांच्या हातात असणार आहे तर बेंगलोरचे नशिब मुंबईच्या हातात असणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती हा सामना होणार आहे. (MI vs DC)

मुंबईच्या संघाला एक फायदा होणार आहे ज्याने दिल्लीच्या संघाला विजय जड जाऊ शकतो तो म्हणजे सामना मुंबईच्या होम ग्राऊंडवरती होत आहे. मुंबईच्या संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाहीये. परंतु दिल्लीच्या संघाने आजचा सामना जर गमावला तर ते प्लेऑफमधून बाहेर जाणार आहेत.

दिल्लीचा संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आहे. दिल्लीचा जर इकडे विजय झाला तर तिकडे आरसीबीचा संघ बाहेर पडणार आहे. मुंबईचा संघाला हारल्याने काही फरक पडणार नाहीये परंतु मुंबईचा संघ हॅप्पी एंडींग करण्यासाठी मैदानावर उतरेल. संध्या आरसीबीचे १६ पॉईंट आहेत तर दिल्लीच्या संघाचे १४ प़ॉईंट आहेत.

परंतु दिल्लीचे नेट रन रेट हे आरसीबीच्या संघापेक्षा चांगले आहे. त्यामुळे जर दिल्लीचा संघ सामना जिंकला तर आपोआप प्लेऑफसाठी पात्र ठरेल. दरम्यान या अगोदर गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल, लखनौच्या संघाने प्लेऑओफमध्ये प्रवेश केला आहे. आता प्रतीक्षा फक्त एका संघाची आहे. प्लेऑफमध्ये जाणार चौथा संघ कोणता असणार हे आजचा सामना झाल्यानंतर समजणार आहे.

संभाव्य संघ

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिलक वर्मा, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, संजय यादव, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे.

दिल्ली कॅपिटल्स

सरफराज खान, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार) (विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अॅनरिक नोर्टजे, खलील अहमद.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुछ तो बडा होने वाला है! एनडीएमधील बडा नेता राहुल गांधींच्या संपर्कात

Maharashtra Live News Update: सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील जंगली महाराज रस्ता जॅम

Rohit Sharma : आशिया कपआधी रोहित शर्मासाठी गुड न्यूज; फॅन्स छातीठोकपणे म्हणणार, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!

Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज सुरूच! ५० हजारांसाठी कंत्राटदाराला मारहाण; व्हिडीओ फोटोंसह पुरावे दिले

Dharashiv Crime : जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवलं; आधी गाडीने धडक, नंतर कोयत्याने वार, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT