आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये, शुक्रवारी राजस्थान आणि चेन्नईच्या (CSK vs RR) सामन्यात चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव झाला. एमएस धोनीने शुक्रवारी संध्याकाळी सांगितले की तो 2023 मध्येही आयपीएल खेळणार आहे. धोनीच्या (MS Dhoni) या निर्णयाने भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shashtri) खूप आनंदी आणि प्रभावित झाले आहेत. शास्त्री म्हणाले की, धोनी 'यंदा खूपच फिट दिसत आहे'. यासह रवी शास्त्री म्हणाले की, धोनी आयपीएल 2023 मध्ये चेन्नईसाठी चांगली खेळी खेळेल.
एमएस धोनीने काल म्हणाला तो आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद स्वीकारणार आहे. धोनीने काल चेन्नईच्या चाहत्यांचे आभार देखील मानले आहे. CSK काल IPL 2022 मधील शेवटचा सामना होता. त्यादरम्यान बोलतना धोनीने 2023 चा हंगामा खेळणार असल्याते सुतोवाच दिले आहेत.
शास्त्री यांनी टीम इंडियासोबतच्या (Team India) प्रशिक्षकपदाच्या काळात धोनीच्या संघाचा जवळून अभ्यास केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक असेल पण धोनीचा फिटनेस वाखाणण्याजोगा होता. हंगामाच्या सुरवातील संघाच्या कर्णधार पदी जडेजाची नियुक्त करण्यात आली होती, परंतु अर्धा हंगाम झाल्यानंतर पुन्हा कर्णधार पद धोनीकडे आले होते.
तरीही संघाची कामगिरी सुधारली नाही आणि संघाला प्लेऑफमधून बाहेर पडावे लागले होते. धोनीने आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी करत 200 हून अधिक धावा केल्या, तर धोनीचे वय दिवसेंदिवस वाढत असतानाही धोनीची IPL 2022 मध्ये धोनीची सरासरी 33 पेक्षा जास्त होती.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.