IPL 2022: नव्या हंगामात 5 गोलंदाज होणार मालामाल? 'या' भारतीय बॉलरवर नजरा Saam TV
Sports

IPL 2022: नव्या हंगामात 5 गोलंदाज होणार मालामाल? 'या' भारतीय बॉलरवर नजरा

सध्या फॉर्ममध्ये असलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल 2022 साठी फ्रँचायझीसाठी पहिली पसंती असेल.

वृत्तसंस्था

IPL 2022 ची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात अनेक क्रिकेटपटूंवर मोठी बोली लावली जाऊ शकते. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, मोहम्मद शमीवर आयपीएल 2022 मध्ये मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. मोहम्मद शम्मीने (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या आहेत. या शानदार कामगिरीने तो फ्रँचायझींच्या नजरेत आला आहे. गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमी, जोश हेजलवूड, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, ट्रेंट बोल्ट यांच्या नावाचा समावेश आहे.

सध्या फॉर्ममध्ये असलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल 2022 साठी फ्रँचायझीसाठी पहिली पसंती असेल. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शम्मीने अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. यासह शम्मीने कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळींचा टप्पा देखील पूर्ण केला आहे. शम्मी गेल्या तीन हंगामात आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आयपीएल 2020 मध्ये त्याने सुपर ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या. अनुभवी शमीने गेल्या 3 हंगामात सुमारे 8 च्या इकॉनॉमी रेटसह 58 बळी घेतले आहेत. त्याला आयपीएल 2018 मध्ये पंजाब किंग्जने 4.8 कोटी रुपयांना विकत घेतले होते, जे या वेळी म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये वाढण्याची अपेक्षा आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT