IPL 2022 Auction Saam TV
Sports

IPL 2022 Auction: खेळाडूंची यादी जाहीर; सर्वाधीक ऑस्ट्रेलियाचे

लिलावासाठी नोंदणी केलेल्या 590 खेळाडूंपैकी 228 कॅप्ड खेळाडू तर 355 अनकॅप्ड खेळाडू आहेत.

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या मेगा लिलावामध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी बेंगळुरू येथे होणार्‍या दोन दिवसीय मेगा लिलावात एकूण 590 क्रिकेटपटूंचा समावेश असणार आहे. आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या हंगामात जागातील स्टार खेळाडू स्पर्धेसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत.

लिलावासाठी नोंदणी केलेल्या 590 खेळाडूंपैकी 228 कॅप्ड खेळाडू तर 355 अनकॅप्ड खेळाडू आहेत. श्रेयस अय्यर, शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, यासारख्या उत्कृष्ट भारतीय खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव यांच्याकडेही फँचायझींचे लक्ष असणार आहे. (IPL 2022 Mega Auction)

लिलावात भाग घेणाऱ्या 10 IPL फ्रँचायझी

चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सनरायझर्स हैदराबाद आणि अहमदाबाद हे संघ लिलावात भाग घेतील. फाफ डु प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन, वानिंदू हसरंगा इत्यादी परदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी फँचायझी मोठी बोली लावतील.

48 खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी रुपये असणार आहे. त्याचबरोबर लिलावाच्या 20 खेळाडूंची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये असणार आहे. तर 34 खेळाडू बेस प्राईस 1 कोटी रुपये असणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सर्वाधीक

आयपीएल ही एक अशी स्पर्धी आहे जिथे नेहमीच नव्या खेळाडूंना संधी दिली जाते. सध्या अंडर 19 वर्डकप सुरु आहे. त्यात भारताचे खेळाडू आपली विशेष चमक दाखवत आहेत. यश धुल, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगरगेकर अशा खेळाडूंवर नजर असणार आहे. देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल, क्रुणाल पंड्या, शाहरुख खान, आवेश खान हे खेळाडू देखील आपली ठसा उमटवतील. 14 देशातील खेळाडू या लिलावात भाग घेणार आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाचे सर्वाधीक 47 खेळाडू असणार आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

SCROLL FOR NEXT