RR vs RCB: आज 'राॅयल' संघ आमने-सामने; काय असेल Playing 11 जाणून घ्या Saam TV
Sports

RR vs RCB: आज 'राॅयल' संघ आमने-सामने; काय असेल Playing 11 जाणून घ्या

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्याचा उत्साह वाढला आहे. कोणते 4 संघ प्ले-ऑफचा भाग असतील? यावर अजून निर्णय झालेला नाही.

वृत्तसंस्था

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्याचा उत्साह वाढला आहे. कोणते 4 संघ प्ले-ऑफचा भाग असतील? यावर अजून निर्णय झालेला नाही. आज प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दुबईमध्ये एक महत्त्वाचा सामना खेळावा लागणार आहे. राजस्थान रॉयल्स (RR) संघाची लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी होणार आहे. एकीकडे राजस्थानला त्यांच्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर त्याचवेळी विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता.

राजस्थान रॉयल्स आजच्या सामन्यात मोठा बदल करू शकते. गेल्या सामन्यात संघाला फिरकीपटूंची कमतरता स्पष्ट दिसत होती. अशा स्थितीत मयांक मार्कंडेला आजच्या सामन्यात स्थान मिळू शकते. खराब फॉर्ममध्ये असलेल्या रियान परागच्या जागी मयंकला संधी मिळू शकते. त्याचबरोबर आजच्या सामन्यात कार्तिक त्यागीही परतू शकतो. कार्तिक जयदेव उनाडकटची जागा घेऊ शकतो. संघाचा कर्णधार संजू सॅमसनकडून खूप अपेक्षा असतील, ज्याने शेवटच्या सामन्यात शानदार खेळी केली होती. त्याचबरोबर लियाम लिव्हिंगस्टोनलाही आजच्या सामन्यात मोठी खेळी खेळावी लागणार आहे.

राजस्थान रॉयल्स संभाव्य संघ

एविन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (c & wk), लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लामरोल, मयंक मार्कंडे, राहुल तेवातीया, ख्रिस मॉरिस, चेतन साकारिया, कार्तिक त्यागी, मुस्तफिजुर रहमान.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संभाव्य संघ

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (wk), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, डॅनियल ख्रिश्चन, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT