पाकिस्तानचा BCCI ला झटका! IPL दरम्यान केले न्युझीलंड सोबतच्या मालिकेचे आयोजन Saam Tv
क्रीडा

पाकिस्तानचा BCCI ला झटका! IPL दरम्यान केले न्युझीलंड सोबतच्या मालिकेचे आयोजन

बीसीसीआयने (BCCI) काही दिवसांपूर्वी आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या होत्या.

वृत्तसंस्था

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान न्युझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी -20 मालिकेसाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. या दौऱ्यात, प्रथम तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल आणि नंतर 5 सामन्यांची टी 20 मालिकाचे (PAK vs NZ) आयोजन केले जाईल.

एकदिवसीय मालिकेला 17 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर 25 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण 18 वर्षानंतर पाकिस्तान आपल्या देशात न्युझीलंड सोबतच्या मालिकेचे आयोजन करणार आहे.

दुसरीकडे, बीसीसीआयने (BCCI) काही दिवसांपूर्वी आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या होत्या. IPL-14 चा दुसरा भाग यूएईमध्ये (IPL 2021 Phase 2) 19 सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे आणि अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या 27 दिवसांमध्ये एकूण 31 सामने खेळले जाणार आहेत.

हे स्पष्ट आहे की आयपीएल आणि न्यूझीलंडच्या पाकिस्तान दौऱ्याच्या तारखा आडव्या येणार आहेत. आयपीएल फ्रँचायझीमध्ये न्यूझीलंडचे अनेक खेळाडू सामील आहेत. विशेषत: हैद्राबादचे केन विल्यमसन, मुंबईचा ट्रेंट बोल्ट आणि कोलकत्याचा लॉकी फर्ग्युसन यांचा समावेश आहे. अशा स्थितीत या खेळाडूंना हा दौरा करण्यात अडचण येऊ शकते पण न्यूझीलंड क्रिकेट प्रमुख डेव्हिड व्हाइट यांनी या दौऱ्यातून ज्यांना दिलासा दिला आहे त्यांची नावे स्पष्ट केली आहेत.

आयपीएल 2021 मधील न्यूझीलंडचे खेळाडू

केन विल्यमसन (SRH)

अॅडम मिलने (MI)

ट्रेंट बोल्ट (MI)

मिशेल सॅन्टनर (CSK)

लॉकी फर्ग्युसन (KKR)

टीम सेफर्ट (KKR)

फिन एलन (RCB)

काईल जेमीसन (RCB)

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT