IPL 2021: 'ऋषभ पंत'च्या कर्णधार पदाबाबात श्रेयश अय्यर म्हणतो... Twitter/ @DC
Sports

IPL 2021: 'ऋषभ पंत'च्या कर्णधार पदाबाबात श्रेयश अय्यर म्हणतो...

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातही दिल्ली कॅपिटल्सचे (DC) वर्चस्व कायम आहे.

वृत्तसंस्था

DC vs SRH: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातही दिल्ली कॅपिटल्सचे (DC) वर्चस्व कायम आहे. बुधवारी संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयात संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyash Iyer) 47 धावा केल्या. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने पहिल्याच डावात उत्तम खेळ केला आहे. या खेळीनंतर त्याने ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कर्णधारपदाबद्दलही चर्चा केली.

अय्यरने बुधवारी हैदराबादविरुद्ध दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 41 चेंडूत 47 धावांची नाबाद खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने 9 गडी गमावून 134 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने विजयाचे लक्ष्य 17.5 षटकात केवळ 2 विकेट गमावून पूर्ण केले.

अय्यर म्हणाला, जेव्हा मला कर्णधारपद देण्यात आले, तेव्हा माझी विचार करण्याची पद्धत वेगळी होती. माझी निर्णय घेण्याची क्षमता आणि विचार खूप चांगले होते आणि यामुळे मला गेल्या दोन वर्षात खूप मदत झाली. कर्णधारपद बदलण्याचा निर्णय फ्रँचायझी घेत असते त्यांनी तो घेतला आहे आणि तो मी स्वीकारला आहे. या हंगामाच्या प्रारंभापासून ऋषभ संघाचे कर्णधारपद चांगल्या प्रकारे सांभाळत आहे, म्हणूनच मला वाटले की हा हंगाम संपेपर्यंत त्याचे कर्णधारपद ठेवावे.

अय्यर म्हणाला की तो त्याच्या खेळीवर खूश आहे पण समाधानी नाही. तो म्हणाला, खरे सांगायचे तर मला खूप चांगले वाटते. पण माझी धावांची भूक पूर्वीपेक्षा जास्त आहे. जसजसे तुम्ही खेळत जाता तसतशी तुमची भूक दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाते. म्हणूनच मी समाधानी नाही आणि माझे मनही भरत नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: टिटवाळातील काळूनदीत २ बहिणींचा बुडून मृत्यू

Smartphone Hanging: तुमचा फोन वारंवार हॅंग होतो का? मग 'या' टिप्स करा फॉलो

Balen Shah: Gen-Z क्रांती! कर्नाटकात शिक्षण, नंतर महापौर, प्रसिद्ध रॅपर नेपाळचा कारभार हाकणार?

Maharashtra Politics: मोठी उलथापालथ; ठाण्यात शिंदेंची राजकीय खेळी; भाजपच्या आठ शिलेदारांचा शिवसेनेत प्रवेश

RBI Vacancy 2025 : RBIमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १० ऑगस्टपासून ऑफिसर पदासाठी भरती

SCROLL FOR NEXT