India Women vs West Indies Women  ICC twitter
Sports

INDW vs WIW: ऋचा घोषचा झंझावात, वेस्ट इंडिजचा धुरळा; भारताचा 6 विकेटने सलग दुसरा विजय

Women's T20 World Cup 2023: भारतीय संघाने 11 चेंडू बाकी असतानाच 119 धावांचे लक्ष्य गाठून सामना जिंकला.

Chandrakant Jagtap

India Women vs West Indies Women : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे बुधवारी झालेल्या महिला टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 गडी गमावून 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 11 चेंडू बाकी असतानाच 119 धावांचे लक्ष्य गाठून सामना जिंकला.

याआधी रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करून विश्वचषक 2023 मधील पहिला विजय नोंदवला होता. या विजयानंतरही भारतीय संघ 4 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडनेही आपले दोन्ही सामने जिंकले आहेत पण त्यांचे नेट रनरेट भारतापेक्षा जास्त आहे. (Sports News)

वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्टइंडिजची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात पूजा वस्त्राकरने वेस्टइंडियन कर्णधाराला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र त्यानंतर टेलर आणि कॅम्पबेलमध्ये चांगली भागीदारी झाली. दोघींनी संघाची धावसंख्या 75 च्या पुढे नेली. (CRICKET)

परंतु 77 धावांच्या स्कोअरवर कॅम्पबेल 30 धावा करून बाद झाली. त्यानंतर स्टेफनी टेलरही 42 धावा करून दीप्ती शर्माची बळी ठरली. शेवटच्या सामन्यात चाडियन नेशन आणि शबिका गजनाबी यांनी संघाला 118 पर्यंत पोहोचण्यास मदत केली. भारताकडून दीप्ती शर्मा ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 4 षटकात 15 धावा देत 3 बळी घेतले.

वेस्टइंडिजने दिलेल्या 119 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. दुखापतीतून परतलेली स्मृती मानधना 10 धावा करून बाद झाली आणि जेमिमा रॉड्रिग्जही 10 धावा करून बाद झाली.

यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष यांनी विजयाची जबाबादारी आपल्या खांद्यावर घेत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. भारताला विजयासाठी फक्त 4 धावांची गरज असताना कर्णधार हरमनप्रीत 33 धावा करून बाद झाली. ऋचा घोषने उरलेली कसर भरून काढली आणि भारताला सलग दुसरा विजय मिळवून दिला. ऋचाने 32 चेंडूत 44 धावांची खेळी खेळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT