neeraj chopra twitter
Sports

Neeraj Chopra: पॅरिस ऑलिम्पिकआधी गोल्डन बॉय नीरज चोप्राचा धमाका! सुवर्णपदकावर कोरलं नाव |VIDEO

paavo Nurmi Games 2024, Neeraj Chopra: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राने दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले आहे. ऑलिम्पिकपूर्वी त्याने ८६ मीटर भाला फेकून सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. नीरजने पावो नूरमी गेम्स २०२४ स्पर्धेत तिसऱ्या प्रयत्नात ८५.९७ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकावर निशाणा साधला आहे.

ज्यावेळी नीरजने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकावर निशाणा साधला होता त्यावेळी त्याने भाला फेकताच मागे वळून जल्लोष साजरा केला होता. त्यावरुन स्पष्ट झालं होतं की, हा थ्रो त्याने लांब फेकला होता. यावेळीही त्याने असंच काहीतरी केलं. भाला फेकताच त्याने मागे वळून जल्लोष केला. यावरुन स्पष्ट झालं की, हा थ्रो त्याला सुवर्णपदक जिंकून देऊ शकतो. त्याने यावेळी ८६ मीटर लांब भाला फेकला.

या स्पर्धेचे आयोजन तुर्कूमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत त्याने तुर्कूमध्ये राहणाऱ्या ओलीवर हेलेंडरला मागे सोडलं. त्याने पहिल्या प्रयत्नात ८३.६२, दुसऱ्या प्रयत्नात ८३.४५ आणि तिसऱ्या प्रयत्नात ८५.९७ इतका लांब थ्रो केला. त्यानंतर चौथ्या थ्रो मध्ये त्याने भाला फेकला नाही. पाचव्या प्रयत्नात त्याने ८६ मीटर लांब भाला फेकला आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतीय फॅन्सला नीरजकडून मोठ्या आशा आहेत. कारण त्याला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

नीरज चोप्रा ८६ मीटर लांब भाला फेकून अव्वल क्रमांकावर कायम राहिला. तर फिनलँडचा टोनी केरानेन दुसऱ्या स्थानी राहिला. त्याने ८४.१९ मीटर लांब भाला फेकला. तर ओलीवर हेलेंडरला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT