vinesh phogat twitter
क्रीडा

Vinesh Phogat Journey: हक्कासाठी WFI अध्यक्षांविरोधात लढली, आता पॅरिस गाजवलं, विनेश फोगाटचा संघर्षमय प्रवास!

Vinesh Phogat Struggle Story: विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

भारताची स्टार पैलवान विनेश फोगाटने शानदार कामगिरी केली आहे. विनेशने ५० किलो ग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल इव्हेंटच्या सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील प्री क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनलचा सामना अतिशय महत्वाचा होता. कारण प्री क्वार्टर फायनलमध्ये तिची लढत जगातील नंबर १ खेळाडूसोबत होती.

ऑलिम्पिक सारख्या स्टेजवर देशासाठी पदक जिंकायचं असेल,तर जगातील नंबर १ खेळाडूलाही आस्मान दाखवावं लागतं. विनेश फोगाटनेही असंच काही केलं. तिने प्री क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड नंबर १ आणि गतविजेत्या युवी सुसाकीचा ३-२ ने पराभव केला. यासह क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

सेमिफायनलमध्ये तिचा सामना ऑक्साना लिवाचसोबत झाला. या सामन्यात तिचा आत्मविश्वास वाढलेला होता. कारण या सामन्यात येण्यापूर्वी तिने वर्ल्ड नंबर १ खेळाडूचा पराभव केला होता. या सामन्यातही तिने शानदार सुरुवात केली. सुरुवातीला तिने ऑक्साना लिवाचला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. मात्र शेवटची काही सेकंदं शिल्लक असताना, ऑक्साना लिवाचने कमबॅक केलं. आघाडीवर असलेल्या विनेश फोगाटने आपली आघाडी राखून ठेवली आणि हा सामना ७-५ ने आपल्या नावावर केला.

विनेश फोगाटचा संघर्षमयी प्रवास

विनेश फोगाट आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत निडर होऊन लढली आहे. मात्र गेली २ वर्ष तिला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. ही २ वर्ष तिच्यासाठी मुळीच सोपी नव्हती. तिच्यावर भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिम्पिक पात्रता फेरीतील सामन्यांमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिच्यावर आरोप करण्यात आले होते की, विनेशचा प्रशिक्षक आणि फिजिओसाठीचा अर्ज हा तारीख निघून गेल्यानंतर आला होता. हा वाद चांगलाच पेटला होता.

अध्यक्षांविरोधात केलं होतं आंदोलन

भारतीय क्रीडाविश्वाला हलवून ठेवलणारं आंदोलन भारतीय कुस्तीपटूंनी केलं होतं. WFI चे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर लैगिंक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात या खेळाडूंनी आंदोलनही केलं होतं. यासह बृजभूषण सिंग आणि संजय सिंग यांनी विनेश भोगाटला ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्यापासून थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचेही आरोप करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT