indian womens hockey team twitter
Sports

Indian Women's Hockey Team: पॅरिस ऑलिम्पिक खेळण्याचं स्वप्न भंगलं! भारतीय महिला हॉकी संघाचा जपानकडून दारुण पराभव

India vs Japan Highlights: महिला ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धेतील कांस्यपदकाच्या सामन्यात भारतीय संघाला जपानकडून ०-१ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

Indian Women's Hockey Team News:

भारतीय महिला हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा खेळण्याची संधी गमावली आहे. महिला ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धेतील कांस्यपदकाच्या सामन्यात भारतीय संघाला जपानकडून ०-१ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कुठल्याही स्थितीत जिंकायचा होता. मात्र असं होऊ शकलेलं नाही.

भारत आणि जपान यांच्यातील हा रोमांचक सामना १९ जानेवारी रोजी रांचीतील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. जपानकडून काना उराताने सामन्यातील ६ व्या मिनिटालाच गोल केला. हा या स्पर्धेतील एकमेव गोल ठरला. तिने पेनल्टी कॉर्नरवरून हा गोल केला. भारतीय संघाला गोल करण्याची संधी मिळाली, त्यांनी पुरेपूर प्रयत्नही केला.

मात्र जपानचा डिफेन्स भेदण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले. भारतीय संघाला या सामन्यात एकूण ९ पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र भारतीय खेळाडूंना एकाही संधीचं सोनं करत आलं नाही. दीपिका ज्युनियर आणि उदिताकडून भारतीय संघाला चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र ती हवा तसा खेळ करू शकलेली नाही. (Latest hockey news in marathi)

आपला पहिलाच गमावलेल्या भारतीय संघाने पुढील सामन्यांमध्ये इटली आणि न्यूझीलंडला धूळ चारली. यासह पुल बीमध्ये दुसरं स्थान पटकावलं. या विजयासह भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये स्थान पटकावलं.

फायनलमध्ये जाण्याची संधी असताना भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये जर्मनीकडून ३-४ ने पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना २-२ ने बरोबरीत सुटला होता. त्यांनतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय संघ १ गोलच्या फरकाने पराभूत झाला.भारतीय संघाला चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याची संधी होती. मात्र ही संधी भारतीय संघाने गमावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro: मूहूर्त ठरला! या दिवशी सुरु होणार मुंबई मेट्रो लाइन 2B; चेंबरपर्यंत धावणार

Valentines Day Gift: व्हॅलेंटाईन डे साठी स्वस्तात मस्त गिफ्ट हवंय? हे ट्रेंडी ब्रेसलेट आहे बेस्ट ऑप्शन

Four Stars of Destiny : पुस्तकाचे पान, राजकारणाचे रान! जनरल नरवणेंच्या आत्मचरित्रावरून भाजप-काँग्रेसमध्ये 'अग्निपथ'

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ३ प्रवाशांचा मृत्यू; १५ जण गंभीर जखमी

Early Cancer Symptoms: महिनाभर आधी त्वचेवर दिसतील 'ही' कॅन्सरची लक्षणे, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT