Paris Olympic 2024: महाराष्ट्राचं नाव जगभरात गाजवणाऱ्या लांब पल्ल्याचा धावपट्टू अविनाश साबळेने मोठा कारनामा केला आहे. त्याची २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सिलेसिया डायमंड लीग २०२३ अॅथलेटिक्स मीटमध्ये त्याने लक्षवेधी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दमदार कामगिरी करत त्याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे. आता देशासाठी ऑलिम्पिक मेडल मिळवणं हेच त्याचं अंतिम लक्ष असणार आहे.
पोलंडमध्ये सुरु असलेल्या सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये रविवारी(१६ जुलै) पुरुषांची ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा पार पडली. हे अंतर त्याने ८:११.६३ वेळेत पूर्ण करत सहावे स्थान पटकावले आहे. (Avinash Sabale)
या चमकदार कामगिरीसह तो पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेसाठी पार ठरला आहे. सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या अविनाशला आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र ही संधी थोडक्यात हुकली आहे.
यापूर्वी अविनाशने हे अंतर ८:११.२० मिनिटांमध्ये पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम केला होता. आता त्याने हेच अंतर ८:११.६३ मिनिटात पूर्ण केले आहे. भारताकडून तो अॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा सहावा खेळाडू ठरला आहे. (Latest sports updates)
सहावा भारतीय अॅथलिट...
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत प्रवेश करणारा अविनाश साबळे हा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर पहिला ट्रॅक अॅथलिट ठरला आहे.
यापूर्वी परमजीत सिंग बिश्त, अक्षदीप सिंग आणि विकास या चार २० किमी रेस वॉकर्सने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे. तर लांब उडीपटू मुरली श्रीशंकर, प्रियांका गोस्वामी आणि आता अविनाश साबळे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.