Indian Cricketer Krishnappa Gowtham retires saam tv
Sports

फिरकी गोलंदाजी, शेवटच्या षटकांत तुफानी फटकेबाजी; ५ आयपीएल संघांकडून खेळलेल्या भारतीय क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती

krishnappa gowtham announces retirement from all formats: भारताकडून केवळ एकच आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळणाऱ्या फिरकीपटूनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएल स्पर्धेत एक नव्हे तर, पाच संघांकडून तो खेळला आहे.

Nandkumar Joshi

फिरकीचं जाळं टाकून फलंदाजाला गिरकी घ्यायला लावणारा, तळाच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन तुफानी फटकेबाजी करणारा आणि तब्बल ५ आयपीएल संघांकडून खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूनं अचानक क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मा यानंही अशाच प्रकारे निवृत्ती जाहीर केली होती.

२०२५ चं वर्ष संपण्याच्या आधीच एका भारतीय क्रिकेटपटूनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कृष्णप्पा गौतम असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. भारताकडून तो फक्त एक वनडे सामना खेळला आहे. मात्र, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. कृष्णप्पाने २२ डिसेंबरला अचानक निवृत्ती घोषित केली. तब्बल १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला त्यानं पूर्णविराम दिला आहे.

कर्नाटककडून तो डोमेस्टिक क्रिकेट खेळत होता. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला फिरकीच्या जाळ्यात ओढण्याची त्याची किमया अद्भूत होती. तसेच तळाच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन तो आक्रमक फटकेबाजी करायचा. आयपीएलमध्ये तो तब्बल पाच संघांकडून खेळला आहे. २०१२ मध्ये कृष्णप्पा पहिला सामना खेळला होता. त्यानंतर त्यानं कधीच मागे वळून बघितलं नाही.

कृष्णप्पाने ५९ प्रथम श्रेणी सामन्यांत २२४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यासोबतच ६८ लिस्ट ए चे सामने खेळून ९६ विकेट्स घेतल्या होत्या. टी २० क्रिकेटमध्ये त्यानं ९२ सामन्यांत ७४ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपरकिंग्ज, किंग्ज इलेव्हन पंजाब, एलएसजी, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या पाच संघांकडून खेळला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला फारशी संधी मिळू शकलेली नाही. भारतीय संघाकडून कृष्णप्पाला केवळ एका वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. २०२१ मध्ये शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघात त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्या सामन्यात त्यानं एक विकेट घेतली होती. तर तीन चेंडूंवर दोन धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याला पुन्हा कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

२०२१ मध्येच चेन्नई सुपरकिंग्जने त्याला ९ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले होते. त्यावेळी तो क्रिकेटविश्वात चर्चेत आला होता. जवळपास ९ वर्षे तो वेगवेगळ्या संघांकडून आयपीएलमध्ये खेळत होता. कृष्णप्पाच्या १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला आता पूर्णविराम मिळालेला आहे. त्यानं निवृत्ती जाहीर केली असली तरी, भवितव्याबाबत काहीही भाष्य केले नाही. त्याचं पुढचं पाऊल काय असेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Tv Exit Poll: ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त १ जागा, इचलकरंजीकरांचा कौल कुणाच्या बाजूने? वाचा इक्झिट पोलचा अंदाज

Saam TV Exit Poll: ठाण्यात महायुतीची सत्ता, बाल्लेकिल्ल्यात एकनाथ शिंदे ठरले 'किंग', तर भाजप नंबर दोनचा पक्ष

Saam Tv Exit Poll: जालनात भाजप बाजी मारेल का? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

Saam TV exit poll: कोल्हापूरमध्ये सत्तेच्या चाव्या अजित पवारांच्या हाती; करवीर नगरीत कोणाला किती जागा?

Palghar Tourism : गर्दीपासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात पालघरमध्ये लपलाय 'हा' समुद्रकिनारा; सुंदर वीकेंड पिकनिक स्पॉट

SCROLL FOR NEXT