Yuzvendra Chahal health update saam tv
Sports

Yuzvendra Chahal: भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची झालीये लागण

Yuzvendra Chahal health update: भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी लेग स्पिनर युजवेंद्र चहल यांची तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना डेंग्यू आणि चिकनगुनिया या दोन गंभीर आजारांचे निदान केले आहे. त्यामुळे ते काही आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलला डेंग्यू आण चिकुनगुनियाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता चहल पुढचा काही काळ क्रिकेट खेळू शकणार नाही. गुरुवारी चहलने त्याच्या तब्येतीबाबत माहिती दिली. आजारपणामुळे चहलला सैयद मुश्ताक अली ट्रॉफीचा फायनल सामनाही खेळता आला नाही. चहलने स्वतः याबाबत माहिती दिली.

युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली

चहलने त्याचा शेवटचा सामना सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला. गेल्या महिन्यात तो हरियाणाकडून ग्रुप मॅचमध्ये खेळला होता. त्यानंतर आता त्याला डेंग्यू आणि चिकुनगुनिया झाल्याची माहिती आहे. या आजारणामुळे तो पुढचे काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून गूर राहणार आहे. ३० नोव्हेंबरपासून तो देशांतर्गत क्रिकेटमधून देखील बाहेर आहे. गुरुवारी पुण्यात झालेल्या झारखंड विरूद्धचा फायनल सामनाही त्याने गमावला.

सोशल मीडियावरून दिली अपडेट

फायनल सामन्यापूर्वी चहलने त्याच्या टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. चहलने त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट केलीये. यामध्ये त्याने लिहिलंय की, SMAT फायनल गाठणाऱ्या माझ्या हरियाणाच्या टीमला खूप शुभेच्छा. टीमचा भाग व्हायची माझीही इच्छा होती मात्र दुर्दैवाने मला डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लागण झाली आहे. ज्याचा माझी तब्येत खालावली आहे.

दरम्यान चहल कमबॅक कधी करणार याबाबत त्याने माहिती दिलेली नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो मैदानात उतरेल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. गेल्या वर्षी झालेल्या टी२० वर्ल्डकपनंतर चहलचं टीम इंडियामध्ये सिलेक्शन करण्यात आलेलं नाही.

काऊंटी क्रिकेटमध्ये घेतलेला सहभाग

युजवेंद्र चहल इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट आणि वन-डे कपमध्ये नॉर्थॅम्पटनशायर टीमसाठी खेळला होता. त्याने सहा सामन्यांत सहा विकेट घेतल्या होत्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट सहापेक्षा कमी होता. त्याने रेड-बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. डिव्हिजन टू काउंटी चॅम्पियनशिपमधील तीन सामन्यांत त्याने 12 विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये एकदा पाच विकेट घेण्याचा रेकॉर्डही केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

SCROLL FOR NEXT