Kuldeep Yadav Record Saam tv
Sports

Kuldeep Yadav Record: दिग्गज गोलंदाजांना मागे सोडत कुलदीप बनलाय नंबर! वनडेत केलाय हा मोठा रेकॉर्ड

India vs Srilanka, Asia Cup 2023: श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात ४ गडी बाद करताच कुलदीप यादवच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

Kuldeep Yadav Record In ODI:

आशिया चषकात भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात कुलदीप यादवच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या.

आता श्रीलंकेविरूद्ध ४ विकेट्स घेत. त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो भारतीय संघाकडून खेळताना सर्वात कमी सामने खेळून १५० विकेट्स घेणारा दुसराच गोलंदाज ठरला आहे.

कुलदीप यादवने आशिया चषकात अप्रतिम गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने या स्पर्धेतील गेल्या २ सामन्यांमध्ये ९ गडी बाद केले आहेत. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने ५ तर श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत.

श्रीलंकेच्या डावातील शेवटच्या फलंदाजाला बाद करताच त्याने १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह सर्वात कमी सामन्यांमध्ये १५० विकेट्स घेणारा पहिलाच डावखुरा गोलंदाज ठरला आहे. तर भारतासाठी सर्वात कमी सामन्यांमध्ये १५० विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. हा कारनामा त्याने केवळ ८८ सामन्यांमध्ये केला आहे. (Latest sports updates)

दिग्गज खेळाडूंना सोडलं मागे..

हा रेकॉर्ड यापूर्वी बांगलादेशच्या अब्दुल रज्जाकच्या नावे होता. रज्जाकने १०८ सामन्यांमध्ये हा कारनामा करून दाखवला होता. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकीपटू ब्रॅड हॉजने हा कारनामा ११८ सामन्यांमध्ये केला होता.

तर शाकिब अल हसनने ११९ सामन्यांमध्ये १५० विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत भारताचा स्टार गोलंदाज रविंद्र जडेजाचा देखील समावेश आहे. जडेजाने हा कारनामा १२९ सामन्यांमध्ये केला होता. आता या सर्व गोलंदाजांना मागे सोडत कुलदीप यादवने या यादीत अव्वल स्थान गाठले आहे.

भारतीय संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना सर्वात जलद १५० विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड हा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावे आहे. त्याने केवळ ८० वनडे सामन्यांमध्ये हा कारनामा करून दाखवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT