indian hockey team saam tv
Sports

Asian Champions Trophy Final: चक दे इंडिया! मलेशियाचा ४-३ ने पराभव करत भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरले नाव

India vs Malaysia Hockey Final: भारतीय संघाने मलेशिया संघाचा धुव्वा उडवत जेतेपदाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

Asian Champions Trophy Hockey India vs Malaysia Final:

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचा थरार चेन्नईमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय हॉकी संघाने अंतिम सामन्यात मलेशियाचा धुव्वा उडवत जेतेपदाला गवसणी घातली आहे. रोमांचक सामन्यात भारतीय संघ ३-१ ने पिछाडीवर होता.

त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने एकापाठोपाठ एक २ गोल केले आणि सामन्यात दमदार कमबॅक केलं. तर चौथ्या क्वार्टरमध्ये चौथा गोल करून भारतीय संघाने ४-३ ने विजय मिळवत एशियन चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवला आहे.

या विजयासह भारतीय संघ ४ वेळेस एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं जेतेपद मिळवणारा एकमेव संघ ठरला आहे. तर ३ वेळेस जेतेपद पटकावणारा पाकिस्तान संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

यापूर्वी भारतीय संघाने २०११, २०१६ आणि २०१८ मध्ये जेतेपदाला गवसणी घातली होती. २०१८ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारत - पाकिस्तान संघाला संयुक्त विजेते घोषित करण्यात आले होते. कारण हा सामना रद्द करण्यात आला होता. तब्बल ५ वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आणि जेतेपदाची ट्रॉफी देखील जिंकली आहे. येत्या काही दिवसात भारतीय संघ एशियन गेम्स स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. (Latest sports updates)

या सामन्यात पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दमदार कमबॅक केले. एकाच मिनिटात २ गोल करत भारतीय संघाने ३-३ ने सामना बरोबरीत आणला. भारतीय संघाकडून हरमनप्रीत सिंग आणि गुरजित सिंगने गोल केला. त्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये ५६ व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने काऊंटर अटॅक करत चौथा गोल केला आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; ४६ अंमलदारांना मिळाली पदोन्नती, सातारा पोलीस दलात मोठा निर्णय

पुणे, सातारा अन् अहिल्यानगरला अवकाळीने झोडपलं; विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस; शेतकऱ्यांचं उरलं-सुरलं पीकही...

CM फडणवीसांकडून संभाजीनगरला मोठं गिफ्ट! EV चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्प अन् AC बस; कोट्यावधी विकासकामांचे लोकार्पण

Maharashtra News Live Update: उद्घाटनापूर्वीच मान मेट्रो स्टेशनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महायुतीची राजकीय खेळी; जळगावसह सोलापुरातील 6 जागा बिनविरोध

SCROLL FOR NEXT