Indian Hockey P R Sreejesh Retirement  Social Media
Sports

PR Sreejesh: भारतीय हॉकी संघातील गोलकीपर पीआर श्रीजेशची निवृत्तीची घोषणा; जाणून घ्या श्रीजेशच्या १८ वर्षांच्या कारकिर्दीतील कामगिरी

P R Sreejesh Retirement: भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने निवृत्ती घेणार असल्याची घोषणा जाहीर केलीय. पॅरिस ऑलिम्पिक ही त्याची शेवटची स्पर्धा असेल, अशी स्वत: त्याने दिलीय. पीआर श्रीजेशने वयाच्या ३६ व्या वर्षी हॉकी खेळातून निवृत्ती घेतली आहे.

Bharat Jadhav

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला २६ जुलैपासून सुरुवात होणार आहे. याच दरम्यान भारतीयांना धक्का देणारी बातमी हाती आली आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीमध्ये दीर्घकाळ कामगिरी बजावल्यानंतर गोलकीपर पीआर श्रीजेश याने निवृत्ती घेण्याची घोषणा केलीय. श्रीजेशने सोशल मीडियावर 'वन लास्ट राईड' म्हणत निवृत्तीची घोषणा केलीय. पॅरिस ऑलिम्पिक हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय दौरा असेल, अशी माहिती त्याने दिलीय.

३२८ सामन्यांनंतर घेतला निवृत्तीचा निर्णय

श्रीजेशने निवृत्तीच्या घोषणा केल्यानतंर हॉकी इंडियानेही अधिकृत घोषणा केलीय. अधिकृत माहिती देताना हॉकी इंडियाने पॅरिसमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय संघाच्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी 'जीत श्रीजश के लिए' अशी टॅगलाइन तयार केलीय. दरम्यान केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील किझक्कम्बलम गावामधील एका शेतकरी कुटुंबातून पीआर श्रीजेशने हॉकीचा प्रवास सुरू केला. भारताच्या हॉकी टीममध्ये पीआर श्रीजेशने महत्त्वाचं स्थान निर्माण केलं होतं. भारताच्या हॉकी टीमचा कर्णधार म्हणून देखील पीआर श्रीजेश यांनी कामगिरी पार पाडलीय.

वयाच्या १८ व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या पीआर श्रीजेशने जवळपास १८ वर्षे क्रीडा जगतात नाव कमावले आहे. त्याने 328 आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर निवृत्तीचा निर्णय घेतलाय. श्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. या काळात संघ आठव्या स्थानावर होता.

सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू

श्रीजेश हा भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. जगातील सर्वाधिक सामने खेळणारा सध्याचा गोलरक्षक आहे. २०११ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात श्रीजेश पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. यानंतर २०२१2 मध्ये त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय हॉकीच्या पदकांचा दुष्काळ संपवला होता.

श्रीजेशचं यश

श्रीजेशने चार ऑलिम्पिक, विश्वचषक, तीन राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांत अनेक पदके जिंकली आहेत. श्रीजेशने आशियाई स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य, राष्ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्य, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चार सुवर्ण आणि एक रौप्य, एफआयएच वर्ल्ड सीरिज फायनलमध्ये सुवर्ण, वर्ल्ड लीगमध्ये कांस्य, एलिट चॅम्पियन्समध्ये दोन रौप्यपदक ट्रॉफी आणि ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT