Vinod Kambli Viral Video News  Saam tv
Sports

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात, अवस्था पाहून चाहते इमोशनल; Video व्हायरल

Vinod Kambli Care Centre Viral Video : विनोद कांबळींचा निदान सेंटरमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी सेंटरमधील सुविधा आणि कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाचे कौतुक केले. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली.

Alisha Khedekar

  • विनोद कांबळींचा निदान सेंटरमधील व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

  • कांबळी यांनी सेंटरमधील सुविधा, स्वच्छता आणि हायजीनचे कौतुक केले

  • व्हिडीओ पाहून काही चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली

  • सेंटरमधील कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल कांबळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कांबळी यांनी आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका वृध्दाश्रमामध्ये असल्याचे दिसत असून चाहत्यांनी त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र, कांबळी यांनी या सेंटरमधील सुविधांचे कौतुक करताना तेथील कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी म्हणताना दिसत आहेत, “मी विनोद कांबळी. आणि मी निदानमध्ये आहे.” पुढे त्यांनी या सेंटरमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या सुविधा मिळत असल्याचं सांगितलं. “निदानमध्ये खूप चांगली सुविधा मला मिळाली आहे. हायजीन वगैरे सगळं एकदम फर्स्ट क्लास आहे,” असं कांबळी यांनी म्हटलं आहे.

मात्र, व्हिडीओमध्ये बोलताना कांबळी यांची जीभ काहीशी अडखळताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता निर्माण झाली आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट करत कांबळी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, कांबळी यांनी सेंटरमध्ये मिळत असलेल्या प्रेमाबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. “इथे कधीही असं वाटत नाही की मी घरी नाही. आणि जे लोक इथे आहेत, त्यांच्याकडून मला खूप प्रेम मिळालं आहे,” असं त्यांनी सांगितलं. व्हिडीओच्या शेवटी त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले.

विनोद कांबळी यांनी १९९१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १७ कसोटी आणि १०४ वनडे सामने खेळले. कसोटीत कांबळी यांनी ५४.२०च्या सरासरीने १०८४ धावा केल्या असून, त्यांच्या नावावर चार शतकं आणि तीन अर्धशतकं आहेत. त्यांची सर्वोच्च कसोटी धावसंख्या २२७ होती. वनडेमध्ये कांबळी यांनी २४७७ धावा केल्या. यामध्ये दोन शतकं आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ९९६५, तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ६४७६ धावा केल्या आहेत. त्यांच्या या व्हिडीओनंतर क्रिकेटप्रेमींकडून कांबळी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! मिळणार ₹18 लाख एरियर? जाणून घ्या गणित

Dahanu : १६व्या शतकातील 'हा' किल्ला आजही आहे जिवंत, तुम्ही कधी पाहिलाय का?

Black Tea for High Blood Pressure: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रूग्ण ब्लॅक टी पिऊ शकतात का?

Maharashtra News Live Update: पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण

Famous Actor : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाला लाच घेताना रंगेहात पकडलं, पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT