sunil gavaskar  saam tv news
Sports

Sunil Gavaskar: 'हा तिरंग्याचा अपमान...', भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यानंतर सुनील गावसकर भडकले; मोठं कारण आलं समोर

Sunil Gavaskar Gets Angry: भारत- दक्षिण आफ्रिका सामन्यानंतर सुनिल गावसकर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Sunil Gavaskar Gets Angry:

भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार खेळ करताना दिसून येत आहे. साखळी फेरीतील सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

तर ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे.

तर झाले असे की, हा सामना सुरु असताना सामना पाहण्यासाठी आलेले काही प्रेक्षक भारताचा राष्ट्रध्वज घेऊन आले होते. या राष्ट्रध्वजावर कंपनीचा लोगो असल्याचं दिसून आलं. हे पाहून समालोचन करत असलेले सुनील गावसकर भडकले. त्यांनी जोरदार टिका करत म्हटले की, भारताच्या ध्वजाचा चुकीचा वापर करता येणार नाही. अशा गोष्टींना परवानगी नाही.' हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने नाबाद १०१ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने ७७ धावांचे योगदान दिले. ५० षटक अखेर भारतीय संघाने ५ गडी बाद ३२६ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी ३५७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत प्रत्येक सामन्यात ३०० धावांचा आकडा गाठणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव या सामन्यात अवघ्या ८३ धावांवर संपुष्टात आला. (Latest sports updates)

भारतीय संघाचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश..

भारतीय संघ हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ८ पैकी ८ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया ,पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड,श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश संघावर विजय मिळवला आहे . भारतीय संघाचा शेवटचा सामना येत्या १२ नोव्हेंबर रोजी नेदरलँड संघाविरुद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT