Cricketer Anshuman Gaekwad passed away:  Saamtv
क्रीडा

Anshuman Gaekwad Death: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटर, प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी

Cricketer Anshuman Gaekwad passed away: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू, माजी प्रशिक्षक असलेले अंशुमन गायकवाड यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक काही महिन्यांपासून अंशुमन गायकवाड यांच्यावर उपचार सुरू होते.

Gangappa Pujari

क्रिडा विश्वातून एक दुखःद बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू, माजी प्रशिक्षक असलेले अंशुमन गायकवाड यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक काही महिन्यांपासून अंशुमन गायकवाड यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली असून ३१ जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंशुमन गायकवाड यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर अमेरिकेमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली असून बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायकवाड यांच्या निधनाने क्रिडा विश्वावर शोककळा पसरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

काही दिवसांपूर्वीच गायकवाड यांच्या उपचारासाठी कपिल देव यांच्यासह टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी पुढाकार घेतला होता. मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, मदन लाल आणि कीर्ती आझाद यांनीही आपल्या सहकारी खेळाडूंना मदतीचा हात पुढे केला. ज्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) अंशुमन यांच्या उपचारासाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

1984 ला इंग्लंड विरुद्धच्या कोलकाता कसोटी हा त्यांचा शेवटचा कसोटी सामना होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अंशुमन यांनी प्रशिक्षकपदातही नाव कमावले 1997-99 दरम्यान ते भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. गायकवाड यांनी गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (GSFC) मध्येही काम केले आणि 2000 मध्ये या कंपनीतून निवृत्त झाले.

जून 2018 मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. अंशुमन गायकवाड यांचे वडील दत्ता गायकवाड यांनीही कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT