Suryakumar yadav saam tv
क्रीडा

ICC T-20 Rankings : ...तर सूर्यकुमार यादव बनणार नंबर वन फलंदाज, पाकिस्तानचा बाबर आझम पिछाडीवर

सूर्यकुमार यादवने आयसीसीच्या टी-२० रॅंकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने आयसीसीच्या टी-२० रॅंकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. सूर्यकुमार (Suryakumar Yadav) आता टी-२० रॅंकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. टीम इंडियाच्या या धडाकेबाज फलंदाजाने पाकिस्तानच्या बाबर आझमला (Babar Azam) मागे टाकले आहे. सूर्यकुमार तिसऱ्या स्थानावर पोहोचल्याने बाबरची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. पहिल्या क्रमांकावर मोहम्मद रिझवानने बाजी मारली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्क्ररम दुसऱ्या स्थानावर आहे. (ICC T-20 Rankings latest News Update)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध काल मंगळवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी करत २६ चेंडूत ४६ धावा कुटल्या. या चमकदार कामगिरीमुळं यादवला आयसीसी (ICC) टी-२० रॅंकिंगमध्ये फायदा झाला. चौथ्या स्थानावर असलेला सूर्यकुमार आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे बाबर आझमने आशिया कप स्पर्धेत खराब कामगिरी केल्यामुळं धावांसाठी तो संघर्ष करत आहे.

इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बाबर ३१ धावांवर बाद झाल्याने त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. याच कारणामुळं टी-२० रॅंकिंगमध्ये बाबर चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला आहे. मोहम्मद रिझवान धावांचा पाऊस पाडत असल्याने तो रॅंकिंगमध्ये अग्रस्थानी आहे. इंग्लंड विरोधात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात रिझवानने ६८ धावांची खेळी केली.

....तर सूर्यकुमार होणार नंबर वन फलंदाज

आगामी होणाऱ्या सामन्यांमध्ये सूर्यकुमार अशाचप्रकारे चमकदार कामगिरी करत राहिला, तर लवकरच तो टी-२० क्रिकेटमध्ये जगातील बेस्ट फलंदाज बनणार. रिझवानकडे आता ८२५ गुण आहेत. तर सूर्यकुमार ४६ गुणांनी पिछाडीवर आहे. सूर्यकुमारकडे सध्या ७८० गुण आहेत. त्यामुळे सूर्यकुमार लवकरच जगातील उत्तम फलंदाज बनणार, अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

SCROLL FOR NEXT