Akshar Patel Suryakumar Yadav Saamtv
Sports

Akshar Patel Wedding : अक्षरचं लगीन, सूर्यकुमारचा प्रश्न अन् अक्षरच्या बायकोचं भन्नाट उत्तर, नेमकं काय झालं?

सुर्यकुमार यादवने अक्षर पटेल आणि मेहा पटेल यांच्या एका फोटोवर केलेल्या कमेंटची आणि त्याला अक्षर पटेलची पत्नी मेहाने दिलेल्या जबरदस्त उत्तराची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

Gangappa Pujari

Akshar Patel Wedding: दोन दिवसांपुर्वी भारतीय संघाचा फलंदाज के एल राहुलने अभिनेत्री आथिया शेट्टीसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने मेहा पटेलसोबत गुजरातमधील वडोदरा लग्नगाठ बांधली आहे.

सध्या भारतीय क्रिकेटपटू सुर्यकुमार यादवने अक्षर पटेल आणि मेहा पटेल यांच्या एका फोटोवर केलेल्या कमेंटची आणि त्याला अक्षर पटेलची पत्नी मेहाने दिलेल्या जबरदस्त उत्तराची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. (Akshar Patel Wedding)

अक्षर पटेल आणि त्याची गर्लफ्रेंड मेहा यांचा गेल्या वर्षी २० जानेवारीला साखरपुडा झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अक्षरची पत्नी मेहा डायटिशियन आणि न्यूट्रिशियन आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते आणि फोटो शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वीच मेहाने अक्षर पटेलसोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये अक्षर आणि मेहच्या हातात एक गोंडस कुत्र्याचं पिल्लूही दिसत आहे. त्यांच्या या फोटोंवर सुर्यकूमार यादवने केलेल्या कमेंटने लक्ष वेधले आहे. (Suryakumar Yadav)

मेहा पटेलच्या या पोस्टवर सुर्यकुमार यादवने अक्षर की गुक्की, ? असा खोचक सवाल मेहला विचारला. यावर मेहानेही दोघेही महत्वाचे , पण आधी गुक्की असे भन्नाट उत्तर दिले आहे. सुर्याचा खोचक सवाल अन् मेहा पटेलने दिलेल्या या भन्नाट उत्तराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

कोण आहे मेहा पटेल...

मेहा पटेल व्यवसायाने न्यूट्रिशनिस्ट आहे. ती सोशल मीडियावर डाएट प्लॅनही शेअर करते. मेहा पटेल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.तिची इंस्टग्राम प्रोफाईल पाहिली असता तिला फिरायला खूप आवडत असल्याचे लक्षात येते .

मेहा पटेलच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या दुबई, गोवा आणि स्कॉटलंडच्या सहलींचाही समावेश आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मेहा पटेलचे २१ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : सचिन तेंडुलकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Spa Centre : २० मुलींसोबत एकच मुलगा, स्पा सेंटरमध्ये नको तो धंदा, मसाज सर्व्हिसच्या नावाखाली...

Hidden Place In Palghar : मुंबईजवळील हे हिडन प्लेस तुम्हाला माहीती आहे का? फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी प्रसिध्द

Dnyanada Ramtirthkar Photos : काळी साडी, नाजूक कंबर अन् मराठमोळा साज श्रृंगार; तिळगुळाहून गोड ज्ञानदाचं सौंदर्य

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क, म्हणाला आपले विचार.., VIDEO

SCROLL FOR NEXT