सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटूंचा एक सेल्फी प्रचंड व्हायरल होत असतो. ज्यात एमएस धोनी, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मंयाक अगरवालचा यांचा समावेश असल्याचं दिसून येतं.
हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही एक प्रश्न पडला असेल की, तो रिषभ पंतच्या खांद्यावर असलेला हात नक्की कोणाचा आहे? आता ४ वर्षानंतर या फोटोमागचं सत्य बाहेर आलं आहे.
भारतीय संघातील फलंदाज मंयक अगरवालने ट्विट करत लिहिले की, 'संशोधन, वादविवाद आणि अगणित कट सिद्धांतांनंतर देशवासियांना कळायलाच हवं: रिषभ पंतच्या खांद्यावर असलेला तो हात माझाच आहे.' तसेच त्याने पुढे लिहिले की, ' बाकी सर्व तर्क वितर्क खोटे आहेत..'
मयांक अगरवालचं ट्विट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले की,' आपके हात तो कानून से भी ज्यादा लंबे है..' तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की,' अखेर कोडं सुटलं..' मयांक अगरवालचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
भारतीय संघातून बाहेर..
भारतीय संघातील फलंदाज मयांक अगरवाल हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. मार्च २०२२ मध्ये तो भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. (Latest sports updates)
त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३६ डावांत ४१.३३ च्या सरासरीने १४८८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत. तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ५ डावात ८६ धावा केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.