Car Neutral or First Gear: ट्रॅफिक सिग्नलवर कार न्यूट्रलमध्ये ठेवावी की गिअरमध्ये?

Surabhi Jayashree Jagdish

ट्रॅफिक सिग्नलवर कार थांबल्यावर काय करावं?

लाल सिग्नल लागल्यावर कार थांबवण्यासाठी ब्रेक दाबा. मॅन्युअल कारमध्ये थांबल्यानंतर गिअर न्यूट्रलमध्ये ठेवून क्लचवरील पाय काढू शकता. सिग्नल ग्रीन झाल्यावर आजूबाजूची वाहतूक पाहूनच पुढे जा.

Traffic Signal Driving Tips | saam tv

न्यूट्रलचा वापर

आजकाल अनेक ठिकाणी सिग्नल किती वेळ आहे हे सेकंदांमध्ये दाखवलं जातं. अशावेळी सिग्नलवर बराच वेळ थांबावं लागणार असेल तर मॅन्युअल कार न्यूट्रलमध्ये ठेवणे सोयीचे ठरते. यामुळे क्लच सतत दाबून ठेवण्याची गरज पडत नाही.

Red Light Driving Tips | saam tv

पहिला गिअर

सिग्नल ग्रीन होणार असेल आणि लगेच पुढे जायचे असेल तर मॅन्युअल कार पहिल्या गिअरमध्ये ठेवता येते. यासाठी क्लच पूर्ण दाबून पहिला गिअर टाका आणि कार पुढे न्या. मात्र बराच वेळ थांबताना क्लच सतत दाबून ठेवण्याऐवजी न्यूट्रलचा वापर करणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.

Automatic Car Driving Tips | saam tv

ऑटोमॅटिक कार

ऑटोमॅटिक कारमध्ये थोड्या वेळासाठी थांबताना ब्रेक दाबून गिअर D मध्ये ठेवता येतो. सिग्नलवर जास्त वेळ थांबायचं असल्यास वाहनाच्या सूचना पुस्तिकेनुसार योग्य गिअर निवडा. पार्किंग करताना मात्र कार P मोडमध्ये ठेवून पार्किंग ब्रेक लावा.

First Gear in Manual Car | saam tv

सिग्नलवर हँडब्रेक लावणं का महत्त्वाचं?

सिग्नलवर बराच वेळ थांबताना हँडब्रेक लावल्याने कार जागेवर स्थिर ठेवण्यास मदत होते. रस्त्याला उतार किंवा चढ असेल तर हँडब्रेकचा वापर महत्त्वाचा ठरतो. पुन्हा गाडी सुरू करण्यापूर्वी हँडब्रेक सोडायला विसरू नका.

Car Clutch Maintenance | saam tv

क्लच सतत दाबून ठेवल्याने काय होतं?

मॅन्युअल कारमध्ये सिग्नलवर बराच वेळ क्लच दाबून ठेवल्यास क्लचवर अधिक ताण येऊ शकतो. त्यामुळे कार थांबलेली असताना क्लच दाबून ठेवण्याऐवजी न्यूट्रलमध्ये गिअर ठेवणं सोयीच असत. गाडी पुन्हा सुरू करताना क्लच पूर्ण दाबून गिअर टाका आणि मग हळूहळू क्लच सोडा.

Traffic Signal Rules | saam tv

कार न्यूट्रलमध्ये ठेवावी की गिअरमध्ये

सिग्नलवर किती वेळ थांबायचं आहे यानुसार कार न्यूट्रलमध्ये ठेवायची की गिअरमध्ये हे ठरवा. मॅन्युअल कारमध्ये थोडा वेळ थांबताना पहिला गिअर आणि क्लच वापरता येतो, तर जास्त वेळ थांबताना न्यूट्रल हा सोयीचा पर्याय आहे.

Manual Transmission Guide | saam tv

Tyre expiry date: वाहनांच्या टायरची एक्सपायरी डेट काय असते? जाणून घ्या

Tyre expiry date | saam tv
येथे क्लिक करा