भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कनिष्ठ निवड समितीने आगामी अंडर 19 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये मुंबईचा अष्टपैलू व सर्फराज खानचा भाऊ मुशीर खानचाही समावेश आहे. भावाच्याच पावलावर पाऊल ठेवत मुर्शीद खानही क्रिकेटचे मैदान गाजवताना दिसणार आहे.
देशांतर्गत क्रिकेट सामन्यात आपल्या स्फोटक फलंदाजासाठी ओळखला जाणारा खेळाडू म्हणजेच सर्फराज खान (Sarfaraj Khan). रणजी ट्रॉफीमध्ये स्फोटक फलंदाजी करत अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केलेत. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत सरफराजच्या भावाने म्हणजेच मुशीर खानने क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केलीय.
१८ वर्षीय मुशीर खानची (Mushir Khan) आगामी अंडर १९आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खानही मुंबई संघाकडून खेळतो. मुशीर हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो सर्फराज खानपेक्षा तो ७ वर्षांनी लहान आहे.
मुशीर खानने आतापर्यंत 3 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत ज्यात त्याने एकूण 96 धावा केल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याने एकूण 2 बळी घेतले आहेत. मुशीर खानने सीके नायडू ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध त्रिशतक झळकावले होते आणि या त्रिशतकानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला.
मुशीर खानने हैदराबादविरुद्ध शानदार खेळी करत ३६७ चेंडूत ३३९ धावा केल्या, तर मुशीर खानने ३४ चौकार आणि ९ षटकार ठोकले. सर्फराज खान आणि मुशीर खान हे दोघेही गेल्या वर्षी मुंबईसाठी रणजी खेळताना दिसले होते. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.