Arshin Kulkarni News: MPLमध्ये वेगवान शतकी खेळीचा विक्रम, सोलापूरच्या पठ्ठ्याची टीम इंडियात एन्ट्री; कोण आहे अर्शिन कुलकर्णी?

Arshin Kulkarni Profile Story: १९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीचाही यामध्ये समावेश आहे. सोलापूरचे बालरोग तज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांचा तो चिरंजीव आहे.
Arshin Kulkarni Profile Story
Arshin Kulkarni Profile StorySaamtv
Published On

Who Is Arshin Kulkarni:

UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर (शनिवार) रोजी बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट निवड समितीने १५ सदस्यांची यादी जाहीर केली. राज्यातील तीन युवा खेळाडूंनी टीम इंडियात स्थान मिळवले. सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीचाही यामध्ये समावेश आहे. कोण आहे टीम इंडियात एन्ट्री करणारा हा युवा खेळाडू.. जाणून घ्या सविस्तर.

कोण आहे अर्शिन कुलकर्णी?

१९ वर्षाखालील भारतीय संघात निवड झाल्याने अर्शिन कुलकर्णीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विजयवाडा येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या चौरंगी क्रिकेट स्पर्धेतील अष्टपैलू कामगिरीच्या आधारावर अर्शिनला ही संधी मिळाली आहे. अर्शिन कुलकर्णी हा मूळचा सोलापूरचा. सोलापूरचे बालरोग तज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांचा तो चिरंजीव आहे.

विशेष म्हणजे भारतीय संघाकडून आशिया कप स्पर्धा खेळणारा अर्शिन हा सोलापूरचा पहिला खेळाडू ठरला आहे. अर्शिनला बालपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड. आत्तापर्यंत सोलापुरमध्ये १४, १७, १९ या वयोगटातील स्पर्धांमध्ये त्याने खेळल्या आहेत. पुढे त्याची महाराष्ट्र प्रीमियर लीग, वीनू माकंड ट्रॉफी, एन केपी साळवे ट्रॉफी, सय्यद अली ट्रॉफीमध्ये निवड होत गेली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Arshin Kulkarni Profile Story
Ind vs Aus 2nd T20i : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात टॉस महत्त्वाचा; कशी असेल प्लेईंग 11 आणि पिच रिपोर्ट?

महाराष्ट्र प्रिमीयर लीगमध्ये वेगवान शतक...

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रीमिअर लीगमधील धमाकेदार शतकी खेळीने अर्शिन कुलकर्णी चर्चेत आला होता. ऋतुराज गायकवाडच्या पुणेरी बाप्पा आणि नाशिक टायटन्स यांच्यामध्ये हा सामना रंगला होता. या सामन्यात नाशिक टायटन्सकडून खेळताना अर्शिनने अवघ्या १६ चेंडूंत ९० धावांची तुफानी खेळी केली होती.

तसेच या सामन्यात त्याने ५४ चेंडूंमध्ये ११७ धावांची वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. या खेळीमध्ये अर्शिनने १३ गगनचुंबी षटकार आणि तीन चौकारांची बरसात केली होती. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com