Ind vs Aus 2nd T20i : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात टॉस महत्त्वाचा; कशी असेल प्लेईंग 11 आणि पिच रिपोर्ट?

Ind vs Aus 2nd T20i : तिरुवनंतपुरम ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवर सुरुवातीला मदत मिळते. अशा परिस्थितीत दोन्ही संघ नाणेफेक जिंकून गोलंदाजी करू शकतात.
Ind vs Aus 2nd T20i
Ind vs Aus 2nd T20iSaam TV

IND vs AUS, 2nd t20 Match :

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत चांगली सुरुवात केली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियांने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या T20 सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या 80 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने 209 धावांचे मोठे लक्ष्य गाठले होते. मालिकेतील दुसरा सामना आज तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.

तिरुवनंतपुरम ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवर सुरुवातीला मदत मिळते. अशा परिस्थितीत दोन्ही संघ नाणेफेक जिंकून गोलंदाजी करू शकतात. दोन्ही संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करतात की नाही हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. टीम इंडिया आपल्या विनिंग कॉम्बिनेशनसह पु्न्हा मैदानात उतरु शकते. (Latest Marathi News)

Ind vs Aus 2nd T20i
Mohmmed Shami Video: मोहम्मद शमीने हृदय जिंकलंं! अपघातग्रस्त तरुणासाठी ठरला देवदूत; VIDEO व्हायरल

तिरुवनंतपुरम आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळले गेले आहेत. एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर 2 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत, तर एकात पराभव पत्करावा लागला आहे.

Ind vs Aus 2nd T20i
Arshin Kulkarni News : सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीची भारतीय क्रिकेट संघात निवड, अंडर १९ संघाकडून खेळणार

या मैदानावर सर्वोच्च धावसंख्या 173 आहे, जी वेस्ट इंडिजने 2019 मध्ये भारताविरुद्ध धावांचा पाठलाग करताना केली होती. मैदान गोलंदाजांना अधिक मदत करते. या मैदानावर भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी (3/32) केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com