virat kohli  saam tv
Sports

Virat kohli On Earning: विराटला खरंच एका इंस्टाग्राम पोस्टचे 11.45 कोटी मिळतात का? स्वत: ट्विट करत केला मोठा खुलासा

Virat kohli On Instagram Earning: विराटला खरंच एका इंस्टाग्राम पोस्टचे 11.45 कोटी मिळतात का? याबाबत आता विराटने मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Tweet On Instagram Earning:

भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली मैदानाबाहेर असुनही जोरदार चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे त्याच्या इंस्टाग्रामवरून होणाऱ्या कमाईची. माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला गेला होता की, विराट कोहलीला एक पोस्ट करण्यासाठी ११.४५ कोटी रूपये मिळतात असं म्हटलं गेलं होतं.

मात्र आता विराट कोहलीने हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. त्याचं ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कोहलीने ट्विट करत असं म्हटलं आहे की, त्याच्या इंस्टाग्रामवरून होणाऱ्या कमाईची जी चर्चा सुरू आहे ती खोटी आहे. कोहलीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मला आयुष्यात जे काही मिळालं आहे त्याचा मी आभारी आहे. सोशल मीडियावर माझ्या कमाईच्या बाबतीत अनेक बातम्या सुरू आहेत. मात्र त्या सर्व खोट्या आहेत. '

हे ट्विट करत विराटने स्पष्ट केलं आहे की, त्याला इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी ११.४५ कोटी रूपये मिळत नाही. स्वत: विराटने खुलासा करत आता या अफवांना पूर्णविराम दिला आहे. विराट कोहली हा भारतातील सर्वात फॉलो केला जाणारा खेळाडू आहे. इंस्टाग्रामवर त्याचे २५६ मिलियन फॉलोवर्स आहेत. तो जगातील सर्वात फॉलो केला जाणारा क्रिकेटपटू आहे. (Latest sports updates)

विराट कोहली सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो. तो जाहिरातीतून देखील कोट्यवधींची कमाई करत असतो. मात्र तो इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून किती रूपये कमवतो, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आशिया कप स्पर्धतून करणार कमबॅक..

भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये विराट कोहलीला विश्रांती दिली गेली आहे. तो ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत कमबॅक करताना दिसून येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ई फेरफार पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय

Kitchen Hacks : गॅस शेगडीचे नॉब्स तेलकट, काळे अन् चिकट झालंत? वापरा 'ही' सोपी ट्रिक; मिनिटांत शेगडी दिसेल नव्यासारखी

Best Tiles For Home: बाथरूमपासून ते किचनपर्यंत...! घरात कशा प्रकारचे टाईल्स लावणं योग्य? जाणून घ्या

Night Leg Pain : फक्त रात्रीच पाय का दुखतात? दुर्लक्ष करू नका, 'ही' असू शकतात ३ गंभीर कारणं

Mumbai : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मोबाईल टॉवर उभारणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT