India won against pakistan saam tv
Sports

IND VS PAK T20 : रनमशीनच! भारतासाठी कोहलीची पुन्हा एकदा 'विराट' खेळी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला, खेळंच असा झाला की...

नरेश शेंडे

नवी दिल्ली : टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची दाणादाणा उडवली. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं ऐतिहासिक आक्रमक खेळी करून क्रिकेटविश्वात तो रनमशीन असल्याचं पुन्हा सिद्ध केलं. पाकिस्तानने भारताला 160 धावांचं आव्हान दिलं होतं. पंरतु, विराट कोहलीनं पुन्हा एकदा चमत्कार करून 53 चेंडूत नाबाद 82 धावांची आक्रमक खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.

विजयसाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात पॉवर प्ले मध्ये खराब झाली. चार विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने सावध खेळी करत संधी साधून पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. विराटने 53 चेंडूत नाबाद 83 धावा कुटल्या. तसंच हार्दिकनेही 37 चेंडूत 40 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या दोघांच्या भागिदारीमुळं भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.

टी20 वर्ल्डकप 2022 चा थरार सुरु झाला असून आज भारत-पाकिस्तान यांच्यात मेलबर्नच्या मैदानात महामुकाबला झाला. संपूर्ण क्रिडा विश्वाला या सामन्याची प्रतीक्षा लागली होती.कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाची पलटण घेऊन पाकिस्तान विरोधात मैदानात उतरला. रोहितने पाकिस्तान विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पाकिस्ताननं वीस षटकांत आठ विकेट्स गमावून 159 धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

Amboli Tourism : आंबोलीजवळ असलेला छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT