Rahul Dravid and Virat Kohli saam tv
Sports

Asia Cup 2022 : पाकिस्तान विरुद्ध 'विराट' खेळी, कोहली शतक ठोकणार? राहुल द्रविड म्हणाले...

आशिय करंडक स्पर्धा २०२२ मध्ये क्रिकेट चाहत्यांना अटितटीचे सामने पाहायला मिळत आहेत.

नरेश शेंडे

दुबई : आशिय करंडक स्पर्धा २०२२ मध्ये क्रिकेट चाहत्यांना अटितटीचे सामने पाहायला मिळत आहेत. आज सायंकाळी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात पुन्हा एकदा रंगतदार सामना होणार असल्याने क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने माजी कर्णधार विराट कोहलीच्या (virat kohli) फॉर्मबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Virat Kohli latest News Update)

भारत-पाकिस्तान सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात आज सायंकाळी होणार आहे. तत्पुर्वी, द्रविड (Rahul Dravid) यांनी कोहलीबाबत केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आशिय कपमध्ये विराट फॉर्मात आला असून आज पाकिस्ता विरुद्ध कोहली धावांचा पाऊस पाडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील एक-दोन वर्षांपासून विराट कोहलीला समाधानकारक धावांचा सूर गवसला नाही. मात्र, यंदाच्या आशिय कपमध्ये कोहलीचा फॉर्म परत आला असल्याचे संकेत दिसत आहेत. कारण विराटने यापूर्वी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ३५ आणि हॉंगकॉंग विरोधात ५९ धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट कोहलीचा फॉर्म भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कोहलीच्या फॉर्मबाबत राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल द्रविड पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

विराट कोहली मोठी खेळी करण्याच्या इराद्यात आहे. मला आनंद आहे की, त्याने खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे. विराटने मागील सामन्यात चमकदार कामगिरी केली. एक महिना विश्रांती घेतल्यानंतरही विराटने मैदानात धावा कुटल्या. हे खूप चांगलं आहे. मलाही विराटने फॉर्ममध्ये आलेला पाहून आनंद झाला आहे. विराट किती धावा करतो, हे आमच्यासाठी महत्वाचं नाही.

पण संघाला जिंकायची गरज असल्यास विराटचा छोटासा योगदानही महत्वाचा असणार आहे. माझं विराट कोहली आणि इतर खेळांडूसोबत जे बोलणं झालं आहे, त्याबाबत मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. विराटने हॉंगकॉंग विरुद्ध छान प्रदर्शन केलं. खराब फॉर्मातून विराट बाहेर पडल्याचा आनंद आहे. इथून पुढं विराटला चांगली सुरुवात मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा, यासाठी कळव्यात आगरी-कोळी बांधवांचा कॅण्डल मार्च..

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

SCROLL FOR NEXT