saam tv
Sports

टीम इंडियाला मिळणार नवा 'हेड कोच'; इंग्लंड मालिकेनंतर संघात होणार मोठा बदल, धक्कादायक कारण आलं समोर

Team India Coach: भारतीय संघात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे, कारण झिम्बाब्वे दौरा आणि २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

Bharat Jadhav

  • गौतम गंभीर यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत चर्चा सुरू

  • टीम इंडियाच्या प्रशिक्षक व्यवस्थेत बदल होण्याची चर्चा

  • २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही लक्ष्मण यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बदल आहेत. होय तु्म्ही जे वाचत आहात ते अगदी बरोबर आहे. टीम इंडियाचा हेड कोच बदलणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान गौतम गंभीरच्या जागी माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणार आहे. लक्ष्मण केवळ झिम्बाब्वे मालिकेसाठीच नव्हे, तर २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. विशेष म्हणजे व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चे (COE) प्रमुख आहेत.

टीम इंडियाला मिळणार वेगळे मुख्य प्रशिक्षक

जपानमध्ये १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठीचा भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने याआधीच केली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जपानला रवाना होणार आहे. याच काळात वेस्ट इंडीजचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात २७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान तीन एकदिवसीय (ODI) आणि पाच टी-२० सामने खेळले जाणार आहेत.

आशियाई खेळ आणि भारत-वेस्ट इंडिज मालिका एकाचवेळी होणार असल्यानं गौतम गंभीर वेस्ट इंडिज मालिकेसाठीच्या एकदिवसीय संघात सामील होणार आहे. दरम्यान श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टी-२० संघ व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई खेळांमध्ये सहभागी होणार आहे. त्याआधी झिम्बाब्वे दौऱ्याची जबाबदारीही लक्ष्मण यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

इतकेच नाही तर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्येही काही बदल केले जातील. भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतील, तर हृषिकेश कानिटकर फलंदाजी प्रशिक्षक असतील. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही हाच कोचिंग स्टाफ भारतीय संघासोबत जाण्याची शक्यता आहे.

झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक

भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा २३ जुलै ते २६ जुलै या कालावधीत होणार आहे. यात दोन्ही संघांदरम्यान तीन टी-२० सामने खेळवले जातील. पहिला सामना २३ जुलैला दुसरा २५ जुलैला आणि तिसरा २६ जुलैला होणार आहे. हे तिन्ही सामने हरारे येथे खेळवले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HDFC Bank : रविवारी बँक सुरू राहणार HDFC बँकेने दिली मोठी अपडेट, वाचा कारण

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

घरमालक डिपॉझिट काही केल्या परत देत नाही, काय करावे? जाणून घ्या भाडेकरूंचे कायदेशीर अधिकार

Mobile Password: मोबाईलचा पासवर्ड विसरलात? सर्विस सेंटरला न जाता ‘या’ सोप्या ट्रिकने घरीच करा अनलॉक

Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

SCROLL FOR NEXT