rohit sharma twitter
Sports

IND vs AUS: यशस्वीच्या वादग्रस्त विकेटवर रोहितची शॉकींग Reaction;संघाचा कॅप्टन असं कसं म्हणू शकतो?

Rohit Sharma On Yashasvi Jaiswal Wicket: यशस्वी जयस्वालच्या वादग्रस्त विकेटवर आता कर्णधार रोहित शर्मा आपली प्रतिक्रीया दिली आहे. वाचा नेमकं काय म्हणाला?

Ankush Dhavre

मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला जिंकण्यासाठी ३४० धावांचं आव्हान दिलं होतं. हा सामना ड्रॉ च्या दिशेने जात होता. एका बाजूने विकेट जात होते. तर एका बाजूने यशस्वी जयस्वाल खंबीरपणे उभा होता.

जयस्वाल २०० पेक्षा अधिक चेंडूंचा सामना करुन खेळपट्टीवर टीकून होता. मात्र तेव्हाच कमिन्सच्या बॉलवर त्या त्याने बॅट फिरवली. कमिन्सने जोरदार अपील केली, पण अंपायरने त्याला नॉट आऊट घोषित केलं. DRS घेतल्यानंतर तिसऱ्या अंपायरने त्याला आऊट घोषित केलं. जयस्वालला आऊट घोषित करताच त्याच्या विकेटवरुन चांगलीच चर्चा रंगली. या वादग्रस्त निर्णयावर कर्णधार रोहित शर्माने भाष्य केलं.

चौथा कसोटी सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहितला यशस्वी जयस्वालच्या विकेटबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित म्हणाला, 'स्निकोमध्ये काहीच दिसलं नाही. पण उघड्या डोळ्यांनी पाहीलं, तर चेंडू थोडा झुकला होता. असं वाटत होतं की, चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला आहे. पण अनेकदा आम्ही चुकीच्या निर्णयांना बळी पडतो.'

नेमकं काय घडलं?

भारतीय संघ ३४० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने एक बाजू धरुन ठेवली होती. तो ८४ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून ७१ वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स गोलंदाजीला आला. या षटकातील पाचवा चेंडू कमिन्सने शॉर्ट टाकला.

या चेंडूवर जयस्वालने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेला. जोरदार अपील केली गेली, पण अंपायरने नॉट आऊटचा निर्णय दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने DRS घेतला. तिसऱ्या अंपायरने Snickometerचा वापर करुन चेंडू बॅटला लागलाय की नाही, हे चेक केलं.

त्यात चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क न झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर अंपायरने आपला निर्णय बदलला आणि जयस्वाल आऊट असल्याचा निर्णय दिला. या निर्णयावरुन यशस्वी जयस्वाल नाराजअ असल्याचं दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT