Deepak Chahar  Saam TV
Sports

दीपक चहर अडकणार लग्नबंधनात; भर मैदानात केले होते गर्लफ्रेंडला प्रपोज

दीपक चहरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे, त्यानुसार दीपक आणि जया भारद्वाज 1 जूनला सात फेरे घेणार आहेत.

Pravin

भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर (Deepak Chahar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची तारीख समोर आली आहे, तो त्याची गर्लफ्रेड जया भारद्वाजसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल (Jaya Bhardwaj) झाली आहे. दीपक चहरच्या होणाऱ्या बायकोचे नाव जया भारद्वाज आहे. दोघे बराच काळ एकमेकांना डेट करत होते आणि गेल्या वर्षी लाइव्ह मॅचदरम्यान चहरने तिला प्रपोज केले होते. (Deepak Chahar Marriage Date)

दीपक चहरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे, त्यानुसार दीपक आणि जया भारद्वाज 1 जूनला सात फेरे घेणार आहेत. या लग्नाला अनेक क्रिकेटर्स उपस्थित राहू शकतात. एमएस धोनी आणि त्याची पत्नीही या लग्नाला उपस्थित राहू शकतात. दीपक चहरने स्टेडियममधील सर्व कॅमेऱ्यांसमोर आपल्या गर्लफ्रेंडला अंगठी घालून प्रपोज केले होते. दीपकने 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या पंजाब किंग्ज विरुद्ध 2021 च्या सामन्यात जयाला प्रपोज केले होते. 2021 च्या हंगामात संघ विजयी झाला होता त्यात दिपक चहरच्या गोलंदाजाीचा मोलाचा वाटा होता.

भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर हा आयपीएल 2022 मध्‍ये सर्वात महाग विकला जाणारा गोलंदाज होता. त्याला त्याच्या आधीच्या फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी 14 कोटी रुपयांना विकत घेतले होते. दुखापतीमुळे दीपक चहर आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकला नाही. सीएसकेला दीपक चहरची उणीव भासली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

Cholesterol Test: फक्त कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे म्हणून निर्धास्त आहात? हार्ट अटॅकचा खरा धोका सांगणारा हा 1 आकडा नक्की तपासा

Accident News : मुंबई -गोवा महामार्गावर भयंकर अपघात, भरधाव कारची डंपरला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: समाज आक्रमक, जिल्हाभर काढण्यात येणार मोर्चा

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'या' ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा होणार पुनर्विकास, ८५००० नागरिकांना मिळणार बिल्डिंगमध्ये घर

SCROLL FOR NEXT