मुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी मजबूत संघ बनवण्याकडे लक्ष वेधत आहेत. यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या मोसमात अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत प्रभावित केलं आहे. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे (Shikhar Dhawan) शिखर धवन. आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) शिखरने आतापर्यंत पंजाब किंग्जसाठी ४२१ धावा कुटल्या आहेत.धडाकेबाज फलंदाजीत सातत्य असल्याने टीम इंडियाच्या (India Cricket Team) टी-२० फॉर्मेटमध्ये खेळण्याची शिखरने इच्छा व्यक्त केलीय. दरम्यान, नुकतंच शिखरने त्याच्या भविष्यातील रणनीतीबाबत माहिती दिलीय. पुढील तीन वर्षापर्यंत टी-२० सामने खेळू शकतो, असं शिखर धवन म्हणाला आहे.
पीटीआयसोबत बोलताना शिखर धवन म्हणाला, माझा क्रिकेटमधला अनुभव पाहता छोट्या फॉर्मेटसाठी मी योगदान देऊ शकतो. टी -२० फॉर्मेटमध्ये मी उत्तम कामगिरी करत आहे. मला जी भूमिका दिली गेली त्यामध्ये मी चांगलं प्रदर्शन केलं. मला जे क्रिकेट खेळत आहे त्यात मी फॉर्ममध्ये सातत्य ठेवलं आहे. मग ते आयपीएलचे सामने असो वा घरेलू मैदानातील.
'अजून पुढील तीन वर्षापर्यंत खेळू शकतो'
आगामी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजमध्ये शिखर धवनचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये होणारी सीरिज ९ जूनला सुरु होणार आहे. सामना खेळताना शिखर धवन दबावात नसतो त्यामुळे तो मैदानात मोठी धावसंख्या उभी करतो. अजून कमीत कमी तीन वर्ष क्रिकेट खेळू शकतो, असं शिखरचं म्हणणं आहे. माध्यमांशी बोलताना शिखर म्हणाला, मी माझ्यावर अनावश्यक दबाव घेत नाही. ही एक अशी धाव आहे जी कधी संपत नाही.मी गेल्या काही वर्षांपासून उत्तम फलंदाजी करत आहे. त्यामुळे मी पुढील तीन वर्षांपर्यंत क्रिकेट खेळू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.