PV Sindhu, Common Wealth Games 2022, Michelle Li , India, Badminton saam tv
Sports

Common Wealth Games 2022 : पीव्ही सिंधूची धडाकेबाज कामगिरी; भारतास गाेल्ड (व्हिडिओ पाहा)

सिंधूच्या विजयानंतर देशाच्या क्रीडा क्षेेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Siddharth Latkar

Common Wealth Games2022 : बॅडमिंटनपूट पीव्ही सिंधूने (PV Sindhu) महिला एकेरीत अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेल लीचा (Michelle Li) (२१-१५, २१-१३) असा पराभव करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूनं पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकाविलं आहे. सिंधूच्या विजयानंतर देशाच्या क्रीडा क्षेेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (PV Sindhu Trending News)

पीव्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी तिने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक जिंकले हाेते. आज सिंधूनं सुवर्ण कामगिरी करुन देशवासियांचं मन जिंकलं. (सन 2018) राष्ट्रकुलमध्ये सिंधूने मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याचबरोबर मिश्र संघानं यंदा राैप्यपदक पटकाविलं.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत लक्ष्य सेनचा सामन्यास प्रारंभ झाला आहे. सेनचा सामना मलेशियाचा शटलर त्जे योंग एनजीशी होत आहे. लक्ष्य सेनच्या कामगिरीवर देशवासियांचे लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT