team india twitter
क्रीडा

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Ankush Dhavre

IND-W vs PAK-W, ICC Women's T20 World Cup 2024: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील रोमांचक सामना पार पडला. हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो.

यावेळही असचं घडलं. मात्र शेवटी माजी मारली भारतीय संघाने. भारताच्या रणरागिणींनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत ६ गडी राखून शानदार विजय मिळवला आहे. हा भारताचा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला आहे.

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानचा हा निर्णय फसला. कारण भारताच्या गोंलदाजांनी शानदार सुरुवात करत पहिल्याच षटकात पाकिस्तानला मोठा धक्का दिला.

पाकिस्तानची सलामीवीर फलंदाज फेरोजा शून्यावर माघारी परतली. त्यानंतर मुनीबा अलीने १७ धावा केल्या. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना निदा दारने सर्वाधि २८ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानला २० षटकअखेर ८ गडी बाद १०५ धावा केल्या.

हरमनप्रीत कौर शेवटपर्यंत लढली

गेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १०६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शेफाली वर्माने शानदार सुरुवात करुन देत ३२ धावांची खेळी केली.

तर स्मृती मंधाना ७ धावा करत माघारी परतली. जेमीमा रॉड्रीग्जने २३ धावा करत मधल्या षटकांमध्ये धावांचा गाडा पुढे नेला. कर्णधार हरमनप्रीत कौरने २९ धावांची खेळी केली. मात्र तिला शेवटी मैदान सोडून रिटायर्ड होऊन बाहेर जावं लागलं. शेवटी सजिवन सजनाने चौकार मारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

SCROLL FOR NEXT