India Women vs England Women ODI series/Twitter
India Women vs England Women ODI series/Twitter SAAM TV
क्रीडा | IPL

झुलन गोस्वामीला टीम इंडियाकडून फेअरवेल गिफ्ट, इंग्लंडला २३ वर्षांनंतर त्यांच्याच भूमीत नमवलं

Nandkumar Joshi

India Women Vs England Women | मुंबई: क्रिकेटमधील २० वर्षांच्या कारकिर्दीनंतर निरोपाचा सामना आणि त्यात कामगिरीही जबरदस्त व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. भारतीय महिला संघाची सर्वात अनुभवी खेळाडू झुलन गोस्वामीच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय. क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत करून टीम इंडियानं झुलनला अविस्मरणीय फेअरवेल गिफ्ट दिलं आहे.

लॉर्ड्समध्ये खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील (Cricket) तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडियानं (Team India) गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला १६ धावांनी पराभूत केलं. टीम इंडियानं पहिल्यांदाच इंग्लडला त्यांच्याच भूमीत क्लीन स्वीप दिला. या मालिकाविजयासोबत टीम इंडियानं दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीला विस्मरणीय अशी निरोपाची भेट दिलीय.

टीम इंडियानं दुसरा सामना जिंकून इंग्लंडमध्ये २३ वर्षांनंतर वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. तिसरा सामना प्रसिद्ध क्रिकेटचं मैदान असलेल्या लॉर्ड्सवर खेळवण्यात आला. या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून क्लीन स्वीप देतील, अशी आशा होती आणि झालंही तसंच.

अखेरच्या सामन्यातही झुलन चमकली

भारतीय फलंदाजांनी निराशा केली. संपूर्ण संघ १६९ धावांवर गारद झाला. पण गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. युवा गोलंदाज रेणुका ठाकूरनं २९ धावा देत ४ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यातही ठाकूरनं आपली कमाल दाखवून दिली होती. त्या सामन्यातही तिने चार विकेट घेतल्या होत्या. सुरुवातीच्या चारपैकी तीन विकेट घेऊन ठाकूरनं इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबरडंच मोडलं होतं. झुलननंही गोलंदाजीत कमाल केली. विकेट घेण्यासह तिने फिल्डिंगही उत्तम केली. राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये एक चांगला झेल घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT