India Women Vs Pakistan Women 
Sports

IND vs PAK : भारतीय महिला संघाची अभिमानास्पद कामगिरी, पाकिस्तानला ८८ धावांनी लोळवलं, वर्ल्डकपमध्ये बाराव्यांदा धोबीपछाड

India Women Vs Pakistan Women : महिला विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला धोबीपछाड दिलाय. रविवारी भारताने पाकिस्तान महिला संघाचा ८८ धावांनी पराभव केला.

Namdeo Kumbhar

india women beat pakistan women by 88 runs world cup : भारतीय महिलांनी शानदार कामगिरी करत पुन्हा एकदा पाकिस्तानचा दारूण पराभव केला. विश्वचषकात भारतीय महिलांनी सलग बाराव्यांदा पाकिस्तानच्या महिला संघाचा पराभव केला. रविवारी झालेल्या सामन्यात भारदतीय महिलांनी पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभूत केलेय. वनडे विश्वचषकात भारतीय महिला संघाचा आतापर्यंत पाकिस्तानविरोधात कधीच पराभव झाला नाही. कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २४७ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तर दाखल पाकिस्तानच्या संघाला २०० धावांचाही टप्पा पार करत आला नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ १५९ धावांत गारद झाला.

कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियम रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात थरार झाला. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानाव उतरला होता. भारतीय संघाची सुरूवात सावध झाली, पण लागोपाठ विकेट गमावल्यामुळे धावसंख्या मर्यादीत राहिली. भारतीय महिला संघाकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक ठोकता आले नाही. हरलीन देओल याने ४६ धावांची खेळी केली. प्रतिका रावलने 31 आणि जेमिमा रोड्रीगेजने 32 धावांची खेळी केली. अखेरच्या शेवटच्या षटकात २० चेंडूमध्ये झटपट ३५ धावांची खेळीच्या बळावर २४७ धावांचा डोंगर उभारला.

पाकिस्तानची भयानक अवस्था

भारताने दिलेल्या २४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानची सुरूवात अतिशय खराब झाली. २० धावांच्या आतामध्ये दोन्ही सलामी फलंदाज माघारी परतल्या होत्या. सलामी फलंदाज मुनीबा अलीच्या विकेटची चर्चा झाली. रन आऊट होती की नाही, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. २० षटकात पाकिस्तान संघाच्या ३ विकेट गमावल्या होत्या.

सिदरा अमीन आणि नतालिया परवेज यांनी पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये ६९ धावांची निर्णायक भागीदारी झाली. पण भारतीय गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केले. फातिमा सना, परवेज यांच्या पटापट विकेट फेकल्या. पाकिस्तानच्या संघाने आपल्या अखेरच्या पाच विकेट फक्त १६ धावात गमावल्या. सिदरा अमीन हिने एकाकी झुंज दिली. तिने ८१ धावांचे योगदान जिले. पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव झाला.

12-0 भारताचेच वर्चस्व

महिला वनडे विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत पाकिस्तानला १२ वेळा पराभूत केले आहे. २००५ मध्ये पहिल्यांदा दोन्ही संघात सामना झाला होता, तेव्हापासून आतापर्यंत विश्वचषकाच्या सामन्यात भारताचेच वर्चस्व राहिले आहे. पाकिस्तानला रविवारी ८८ धावांच्या पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगावच्या घटने प्रकरणी उद्या अमरावतीत निषेध सभा

Kolhapur Baba : चुटक्या वाजवत भूत उतरवणाऱ्या भोंदू बाबाला अटक, कोल्हापूर पोलिसांची कारवाई

''३० व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन..'', अनंत गर्जेने पत्नीच्या टोकाच्या पावलावर दिली प्रतिक्रिया, प्रकरणात नवा ट्वीस्ट?

Kalyan : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! महाविद्यालयातच नमाज पठण

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT