India vs Zimbabwe saam tv
क्रीडा

India vs Zimbabwe T20 World Cup live: भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 115 धावांवर गुंडाळलं, भारत सेमीफायनमध्ये

आज वर्ल्डकपचा 42 वा सामना भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळवला जात आहे.

नरेश शेंडे

भारत जिंकला, झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 115 धावांवर गारद

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज सुपर-12 मधील शेवटचा सामना मेलबर्नच्या मैदानात रंगला. या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेला 187 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर भारतानं दिलेलं विशाल लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांची दाणादाण झाली. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून झिम्बाब्वेला 115 धावांवर रोखलं. त्यामुळं भारतानं हा सामना 71 धावांनी जिंकला.

या विजयामुळं भारतानं थेट सेमीफायनमध्ये प्रेवश केला आहे. भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन आश्विननं चमकदार कामगिरी केली. चार षटकात 22 धावा देत तीन फलंदाजांना बाद केलं. मोहम्मद शमी- हार्दिक पंड्याला प्रत्येकी 2 विकेटस् आणि भूवनेश्वर, अर्शदीप आणि अक्षरला एक विकेट मिळाली. दरम्यान, आठ गुणांच्या जोरावर भारत ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून पाकिस्तान पिछाडीवर गेला आहे.

झिम्बाब्वेला सहावा धक्का, 16 षटकानंतर धावसंख्या 111-9

आठव्या षटकातही मोहम्मद शमीनं अप्रतिम गोलंदाजी करून टोनी मनयोंगाला अवघ्या पाच धावांवर बाद केलं. त्यामुळं झिम्बाब्वेची धावसंख्या आठ षटकानंतर पाच बाद 39 वर पोहोचली. त्यानंतर नवव्या षटकात आठ धावाच मिळाल्यानं झिम्बाव्बेची धावसंख्या 47-5 वर पोहोचली. त्यानंतर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी गिअर बदलला आणि अकरा षटकानंतर धावसंख्या 75-5 अशी झाली. चौदाव्या षटकात फिरकीपटू रवीचंद्रन आश्विननं रॅन बर्लला 35 धावांवर बाद करून भागिदारी मोडली. त्यानंतर सोळाव्या षटकातही आश्विननं अप्रतिम गोलंदाजी करून फलंदाज वेलिंगटनला फक्त एक धावेवर बाद केलं. त्याच्या पाठोपाठ रिचर्डचाही एका धावेवर त्रिफळा उडवून तंबूत पाठवलं. सतराव्या षटकात सिकंदर रझाला हार्दिक पंड्यानं 34 धावांवर बाद केलं.

मोहम्मद शमीनं सीन विलियम्सला पाठवलं तंबूत, झिम्बाब्वे 31-4

पॉवर प्ले मध्ये झिम्बाब्वेची खराब सुरुवात झाली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं तीन फलंदाजांना माघारी परतावं लागलं. सलामीवीर फलंदाज वेसले मधीवेरेला भूवनेश्वर कुमारनं पहिल्याच चेंडूवर शून्य धावांवर बाद केलं. त्यानंतर फॉर्मात असलेला भारताचा वेगवान गोलंदाज हर्शदीप सिंगनं झिम्बाब्वेच्या रेगिस चकाब्वाला शून्यावर बाद केलं. सहाव्या षटकात मोहम्मद शमीनं सीन विलियम्सला 11 धावांवर बाद केलं. त्यानंतर हार्दिक पंड्यानं क्रेग एर्विनला 13 धावांवर बाद करून झिम्बाब्वेला चौथा धक्का दिला.

झिम्बाब्वेला दुसरा धक्का, पाच षटकानंतर झिम्बाब्वे 21-2

भारतानं झिम्बाब्वेला 187 धावांचं आव्हान दिल्यानंतर मैदानात उतरलेला सलामीवीर फलंदाज वेसले मधीवेरेला भूवनेश्वर कुमारनं पहिल्याच चेंडूवर शून्य धावांवर बाद केलं. त्यामुळे पहिल्या षटकात झिम्बाब्वेला पहिला धक्का बसल्यानं धावसंख्या शून्यावरच स्थिरावली. त्यानंतर फॉर्मात असलेला भारताचा वेगवान गोलंदाज हर्शदीप सिंगनं झिम्बाब्वेच्या रेगिस चकाब्वाला शून्यावर बाद करून दुसरा धक्का दिला. तीन षटकानंतर झिम्बाब्वे 7-2 अशा अवस्थेत होता. त्यानंतर तिसऱ्या षटकातही झिम्बाब्वेची धावसंख्या मंदावली.

सुर्या पुन्हा चमकला, भारताचं झिम्बाब्वेला 187 धावांचं टार्गेट

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सलामीवीर के एल राहुल आणि रोहित मैदानात उतरले. कर्णधार रोहित पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतल्यानंतर राहुलनं आजच्या सामन्यातही क्लास बॅटिंग करून दमदार अर्धशतक ठोकलं. विरा कोहली, राहुल, पंत बाद झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सूर्यकुमार यादव या सामन्यातही चमकला. चौफेर फटकेबाजी करून झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवून सूर्यकुमारने 25 चेंडूत नाबाद 61 धावा कुटल्या. तसंच राहुलनं 35 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्यामुळं वीस षटकात भारतानं पाच विकेट्स गमावून 186 धावांची मजल मारली.

सूर्यकुमार यादव चमकला, 1000 धावा पूर्ण,  19 षटकानंतर भारत 166-5

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं आक्रमक खेळी करून यावर्षीच्या टी20 क्रिकेट सिजन मध्ये 1000 धावा ठोकल्या आहेत. आजच्या सामन्यातही सूर्यकुमार झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत आहे. शेवटच्या विसाव्या षटकात रिचर्डच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्या 18 धावांवर बाद झाला.

सूर्यकुमार-हार्दिकची आक्रमक खेळी, 18 षटकानंतर भारत 152-4

विराह कोहली, के एल राहुल आणि रिषभ पंत बाद झाल्यानंतर भारताची धावसंख्या कोलमडली होती. पण कमालीचा फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या आक्रमक खेळी करून भारताच्या धावसंख्येचा आलेख उंचावत आहेत.

पंधरा षटकानंतर भारताची धावसंख्या 107-4

विराट कोहली 26 धावांवर बाद झाल्यानंतर के एल राहुलनंही अर्धशतक ठोकून विकेट गमावली. राहुलनं आजच्या सामन्यातही आक्रमक खेळी करून 35 चेंडूत 51 धावा कुटल्या. त्यानंतर रिषभ पंत स्वस्तात माघारी परतला. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या कमान सांभाळत असून आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्नात आहेत.

षटकार मारण्याच्या प्रयत्नात रिषभ पंत झाला बाद, भारत 103-4

विराट कोहली 26 धावांवर बाद झाल्यानंतर के एल राहुलनंही अर्धशतक ठोकून विकेट गमावली. राहुलनं आजच्या सामन्यातही आक्रमक खेळी करून 35 चेंडूत 51 धावा कुटल्या. झिम्बाब्वे विरुद्ध आजच्या सामन्यात भारताकडून विकेटकीपर दिनेश कार्तिकला विश्रांती देण्यात आली. कार्तिकच्या जागेवर रिषभ पंतला संधी देण्यात आलीय. मात्र, रिषभ पंतने षटकार मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली. पंत अवघ्या तीन धावा करून सीन विलियम्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

आक्रमक फिफ्टी करून राहुल बाद, तेरा षटकानंतर भारत 100-3

रिचर्डनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात राहुलनं आक्रमक खेळी करून भारताची धावसंख्या 18 वर पोहोचवली. त्यानंतर गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानीनं सटीक लाईनवर चेंडू फेकून रोहित शर्माची शिकार केली. रोहित 13 चेंडूत 15 धावा करून झेलबाद झाला. पाच षटकानंतर भारताची धावसंख्या एक बाद 36 वर पोहोचली. त्यानंतर विराट-राहुलनं अर्धशतकी भागिदारी रचली. पण सिन विल्यम्सच्या गोलंदाजीवर विराट 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी करून राझाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद, पाच षटकानंतर भारत 36-1

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात मेलबर्नच्या मैदात लढत सुरु आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज रिचर्डने पहिलं षटक अचून टप्प्यावर टाकून भारताला खातंही उघडू दिलं नाही. भारताची सुरुवात मेडन ओव्हरनं झाली. दरम्यान दुसऱ्या षटकानंतर भारताला धावांचा सूर गवसला. दोन छटकानंतर भारताची धावसंख्या बिनबाद सहावर पोहोचली. रिचर्डनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात राहुलनं आक्रमक खेळी करून भारताची धावसंख्या 18 वर पोहोचवली. त्यानंतर गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानीनं सटीक लाईनवर चेंडू फेकून रोहित शर्माची शिकार केली. रोहित 13 चेंडूत 15 धावा करून झेलबाद झाला. पाच षटकानंतर भारताची धावसंख्या एक बाद 36 वर पोहोचलीय.

भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपचा थरार सुरु असून दिवसेंदिवस रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. आज वर्ल्डकपचा 42 वा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात मेलबर्नमध्ये सुरु होणार आहे. सुपर-12 मधील हा शेवटचा सामना असून भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेदरलॅंडने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केल्यामुळं भारताचं सेमीफायनलचं तिकिट फिक्स झालं आहे. सहा गुण प्राप्त करून भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

Numerology: या तारखेला जन्मलेली व्यक्ती असते श्रीमंत, राजसारखे आयुष्य जगते

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

SCROLL FOR NEXT