India Vs west Indies T 20 series Sanju Samson added Team India Squad / BCCI Tweet SAAM TV
क्रीडा

Ind vs WI : धमाकेदार फलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री; रोहित शर्मासाठी आहे 'स्पेशल'

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे.

Nandkumar Joshi

मुंबई: भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडीजला वनडे मालिकेत क्लीन स्वीप दिला. त्यानंतर आता टी-२० मध्ये धमाका करण्याच्या तयारीत टीम इंडिया आहे. पहिला सामना आज, शुक्रवारी त्रिनिनादमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल.

दुसरीकडे सामना सुरू होण्यापूर्वी काही तासांआधीच भारतीय टीममध्ये मोठा बदल झाला आहे. टीम इंडियात संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसन हा वनडे मालिकेत होता. मात्र, टी-२० चमूत त्याला स्थान मिळाले नव्हते. आता केएल राहुल टी - २० सीरीजमधून बाहेर झाल्याने संजूला संधी मिळाली आहे. (India vs West Indies T 20)

वेस्ट इंडीजविरुद्ध (West Indies) संजू सॅमसनची (Sanju Samson) कामगिरी काही खास झालेली नाही. त्याने ३६ च्या सरासरीने ७२ धावाच केल्या आहेत. यात त्याचे एक अर्धशतक होते. संजू सॅमसनची फलंदाजी आणि तिचे वैशिष्ट्ये बघता ही कामगिरी अत्यंत खराब मानली जाते. पण कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हेड कोच राहुल द्रविडने संजू सॅमसनवर भरवसा दाखवला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि द्रविड ही जोडी टीम इंडियात आल्यानंतर संजू सॅमसनला वारंवार संधी दिली जात आहे. आता संजूला मिळालेल्या संधीचं सोनं करावे लागणार आहे.

दरम्यान, संजू सॅमसनची एन्ट्री झाली असली तरी, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळणे जवळजवळ अशक्य मानले जात आहे. इतकेच नाही तर, टी-२० मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या दीपक हुडालाही स्थान मिळवणे सोपे नाही. वेस्ट इंडीज मालिकेत द्रविड आणि रोहित शर्मा ही जोडगोळी प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी देणार हे अद्याप उघड झालेले नाही. विशेष म्हणजे आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांसारख्या दिग्गजांचेही स्थान पक्के नाही.

टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), दिनेश कार्तिक, रिषभ पंत, अर्शदीप सिंग, आवेश खान, हर्षल पटेल, रविंद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, ईशान किशन.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

SCROLL FOR NEXT