Captain Suryakumar Yadav removes his cap and salutes Sanju Samson after his stunning match-winning knock against West Indies cricket team. saam tv
Sports

Sanju Samson: आधी थट्टा आता डोक्यातील कॅप काढून ठोकला सॅल्यूट; सूर्यादादा संजूसमोर नतमस्तक

Suryakumar Yadav Bowing Down To Sanju Samson: संजू सॅमसन याला गेल्या अनेक महिन्यांत कमीपणा घ्यावा लागला. मात्र संजूने बोलून नाही तर दाखवून दिलं. संजूच्या मॅचविनिंग खेळीमुळे जोरावर कर्णधार सूर्यकुमार यादव नतमस्तक झालाय, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

  • संजू सॅमसनने तुफानी मॅचविनिंग खेळी करत टीकाकारांना उत्तर दिलं.

  • कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला सार्वजनिकपणे सॅल्यूट करत कौतुक केलं.

  • सोशल मीडियावर कर्णधाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

'भगवान के घर में देर है, अंधेर नही', देवाला ज्यावेळी द्यायचं असतं तो त्यावेळी देत असतो. अशी वाक्य आपण अनेकदा वडिलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकली असतील. याचीच प्रचिती कोलकातामध्ये झालेल्या सामन्यादरम्यान आली. गेल्या कित्येक सामन्यात अपयशी होणाऱ्या संजू सॅमसनवर देवानं या सामन्यात कृपादृष्टी दाखवली. संजू टी 20i वर्ल्ड कपआधी शेवटच्या 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध अपयशी ठरला. त्यामुळे ऐनक्षणी संजूला वर्ल्ड कपच्या प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू देण्यात आला. इतकेच नाही तर कर्णधार सूर्यकुमार यादवनं तर त्याची टिंगल केली होती.

पण वेळ सतत बदलत असते. ज्यावेळी बदलते त्यावेळी टीकाकारही तुमचे कौतुक करण्यात मग्न होतात. ही गोष्ट य टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज संजू सॅमसन याला तंतोतंत लागू पडते. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या संजूला बाहेर बसवण्यात येत होते त्यावेळी सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत संजूला संधी देण्यावरुन टिंगल उडवली होती. त्याला संधी द्याची? असं म्हणत सूर्याने संजूला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र संजूने यावर व्यक्त न होता आपल्या कामगिरीने सूर्यादादाला त्याच्यासमोर नतमस्त व्हायला भाग पाडलं.

निर्णायक सामन्यात इतर फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मॅचविनर म्हणून संजूने महत्त्वाची भूमिका पार पाडली. संजूने रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध 196 धावांचा पाठलाग करताना चौकार ठोकून टीम इंडियाला जिंकवलं. संजूने नाबाद 97 धावा केल्या. संजूच्या या खेळीच्या जोरावर भारताने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. संजूच्या दमदार खेळीसाठी अनेकांनी त्याचे कौतुक केले.

संजूसमोर कॅप्टन सूर्या नतमस्तक

विजयानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांसह हस्तांदोलन केलं. संजू आण शिवम दुबे मैदानाबाहेर जात होते. तर टीम इंडियातील इतर खेळाडू मैदानात येत होते. या दरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादव याने संजू समोर येताच डोक्यावरुन टोपी काढली. सूर्या संजूसमोर नतमस्तक झाला. सूर्या संजूसमोर नतमस्तक झाल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan Pakistan War : पाकिस्तानवर एअरस्ट्राइक! नूर खान बेसवर अफगाणिस्तानचा शक्तिशाली हल्ला, फोटो अन् व्हिडिओ आले समोर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! प्रतितोळा ₹१७१००० वर पोहचले, आठवड्यात कधी स्वस्त, कधी महाग? वाचा सविस्तर

Messy Bun Hairstyle: साडीवर शोभून दिसणारा मेसी बन कसा बांधायचा? स्टेप बाय स्टेप पद्धत

Maharashtra Live News Update : लातूर जिल्हा परिषदेत भौतिक सुविधांचा अभाव

Mumbai Crime: मुंबई हादरली! भांडुपमध्ये शाळकरी मुलाची मित्रांकडून हत्या, आधी संपवलं नंतर तलावात फेकलं

SCROLL FOR NEXT