India vs West Indies live score t20 world cup ()
Sports

Abhishek Sharma : अभिषेक शर्माकडून सर्वात मोठी चूक, मॅच विनर खेळाडूचा सोप्पा कॅच सोडला, सूर्याची रिअॅक्शन व्हायरल

Abhishek Sharma dropped catch video reaction : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज करो या मरो सामन्यात अभिषेक शर्माने सोपा झेल सोडल्याने सामना रंगला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मिळालेल्या संधीचा फायदा विडिंजने घेत पॉवरप्लेमध्ये दमदार सुरुवात केली.

Namdeo Kumbhar

India vs West Indies live score : करो या मरो सामन्यात सलामी फलंदाज अभिषेक शर्माने मोठी चूक केली. पाचव्या षकटाक सूर्यकुमार यादव याने विडिंजच्या विस्फोटक फलंदाजाचा सोप्पा झेल सोडला. जसप्रीत बुमरहाच्या गोलंदाजीवर रेस्टोन चेस याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेतच उडाला. अभिषेक शर्मा चेंडूच्या खाली होती. पण त्याच्याकडून चूक झाली अन् अतिशय सोपा झेल सुटला. या झेलचा फटका भारतीय संघाला मोठा बसण्याची शक्यता आहे. पॉवरप्लेमध्ये विडिंजने अतिशय़ तगडी सुरूवात केली आहे. रेस्टन चेज आणि शाय होप यांनी ६ षटकात बिनबाद ४६ धावांचा डोंगर उभारला.

अभिषेक शर्माकडून मोठी चूक -

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विडिंजच्या सलामी फलंदाजांकडून सावध सुरूवात केली. अर्शदीप सिंह आणि हार्दिक पांड्या यांची गोलंदाजी खेळू काढली. बुमराह पाचवे षटक घेऊन आला. त्याने अचूक टप्प्यावर मारा केला. पण पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्माने मोठी चूक केली. रेस्टन चेज याचा अतिशय सोपा झेल सोडला. अभिषेक शर्माच्या हातात दोन वेळा चेंडू आला पण त्याला पकडता आला नाही. अभिषेक शर्माने झेल सोडल्यानंतर मैदानात नाराजी होती. चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा साफ दिसत होती. अभिषेक शर्मा याने झेल सोडल्यानंतर सूर्यकुमार यादव यालाही राग आल्याचे दिसले.

विडिंजची अश्वासक सुरूवात -

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने धमाकेदार सुरूवात केली. पॉवरप्लेच्या ६ षटकात विडिंजने एकही विकेट न गमावता ४६ धावा फलकावर लावल्या आहेत. चेज ११ चेंडूत २० तर कर्णधार शाय होप २५ चेंडूत २५ धावांवर खेळत आहे. अभिषेक शर्माने खराब फिल्डिंग केल्याचा फायदा चेज याला झालाय आहे. या झेलचा फायदा चेज करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हार्दिक पांड्याने पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात ११ धावा दिल्या. अक्षर पटेल याने २ षटकात १५ धावा दिल्या. तर अर्शदीप सिंह याने २ षटकात १३ धावा दिल्या आहेत. तर जसप्रीत बुमराह याने एका षटकात ७ धावा खर्च केल्या आहेत.

नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने -

कोलकात्यामधील इडन गार्डन मैदानात सुरू असलेल्या सामन्यात सुर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर विडिंजच्या संघात एक महत्त्वाचा बदल केला आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी दोन्ही संघाला विजय अनिवार्य आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत जाणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अ गटातून आफ्रिकेचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहचला आहे. आज दुसरा संघ निश्चित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update: राज्यात आठ दिवस मुसळधार पाऊस; नदी नाल्यांना येणार पूर

Fact Check: E20 पेट्रोल वापराल, विम्याला मुकाल? गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई नाही?

Today Horoscope : वृश्चिक राशीसाठी तिप्पट लाभाचा महासंयोग, मकर-मीन राशीत प्रेमाचा वर्षाव; जाणून घ्या तुमचे भविष्य

ठाकरेसेनेचा पुन्हा पोपट मेला, ठाकरेसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT