yashasvi jaiswal with shubman gill saam tv
क्रीडा

IND vs WI 4th T20 Highlights: जयस्वाल - गिलची यशस्वी भागीदारी! टीम इंडियाचा विंडीजवर ९ गडी राखून विजय; पाहा सामन्याचे Highlights

India vs West Indies 4th T20: भारतीय संघाने हा सामना जिंकून मालिका २-२ च्या बरोबरीत आणली आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 4th T20 Match Result:

भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा टी -२० सामना फ्लोरिडाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ९ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने ही मालिका २-२ च्या बरोबरीत आणली आहे.

या सामन्यात वेस्टइंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडीज संघाकडून शिमरोन हेटमायरने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले.

तर शाई होपने ४५ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर वेस्टइंडीज संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १७८ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ तर कुलदीप यादवने २ गडी बाद केले. (Latest sports updates)

भारतीय संघाकडून वनसाईड फलंदाजी..

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांची जोडी मैदानावर आली होती.

डावाची सुरुवात करताना शुबमन गिलने ४७ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकारांच्या साहाय्याने ७७ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ५१ चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या ८४ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून भारतीय संघासाठी १६५ धावांची विक्रमी भागीदारी केली. यासह भारतीय संघाने या सामन्यात १८ चेंडू शिल्लक असतानाच ९ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत २६ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Ishan Kishan, IPL Mega Auction: काव्या मारणने डाव टाकला! मुंबईच्या विश्वासू खेळाडूला घेतलं संघात

kripalu maharaj : कृपालू महाराजांच्या मुलींच्या कारला भीषण अपघात; मोठ्या मुलीचा मृत्यू, २ जणांची प्रकृती गंभीर

IPL Mega Auction 2025 Live News: राजस्थानने संधी साधली! इंग्लंडच्या सर्वात वेगवान गोलंदाजाला १२.५० कोटीत घेतलं संघात

SCROLL FOR NEXT