India vs West Indies 1st T20: वनडे मालिका जिंकून आलेल्या भारतीय संघाला टी -२० मालिकेत हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला टी -२० सामना त्रिनिदादच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह वेस्टइंडीज संघाने १-० ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्टइंडीज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रोमेन पॉवेलने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तर निकोलस पूरनने ४१ धावांची खेळी केली. तर ब्रेंडन किंगने २८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या बळावर वेस्टइंडीज संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १४९ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून पदार्पणवीर तिलक वर्माने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने २१ धावांचे योगदान दिले.
कर्णधार हार्दिक पंड्याने १९ धावांची खेळी केली. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज होती. मात्र पदार्पणवीर मुकेश कुमार षटकार मारू शकला नाही. त्यामुळे भारतीय संघाला ४ धावांनी पराभवाची चव चाखावी लागली आहे.
पदार्पणवीर तिलकची महत्वपूर्ण खेळी व्यर्थ..
या सामन्यात हार्दिक पंड्याने तिलक वर्माला पदार्पण करण्याची संधी दिली होती. या संधीचं सोनं करत त्याने दमदार कामगिरी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने २२ चेंडूंचा सामना करत ३९ धावांची खेळी केली.
या खेळी दरम्यान त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. तर या सामन्यातून पदार्पण करण्याऱ्या मुकेश कुमारला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याने ३ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने २४ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.