Ind Vs UAE x
Sports

Ind Vs UAE : भारत दुबईत यूएईला भिडणार, हवामान अन् खेळपट्टीचा फायदा कोणाला होणार? वाचा संपूर्ण माहिती

Ind Vs UAE Asia Cup 2025 Details : आशिया कप २०२५ मधील दुसरा सामना भारत विरुद्ध यूएई असा होणार आहे. या सामन्यादरम्यान हवामान, खेळपट्टी कशी असेल? जाणून घ्या सविस्तर माहिती

Yash Shirke

Asia Cup 2025 या स्पर्धेला ९ सप्टेंबर म्हणजेच काल सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगला पराभूत केले. आज (१० सप्टेंबर) स्पर्धेतला दुसरा सामना भारत आणि यूएई यांच्यामध्ये होणार आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. गतविजेता भारतीय संघ पुन्हा विजयी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारत विरुद्ध यूएई सामन्यादरम्यान हवामान कसे असेल?

दुबईमध्ये बुधवारी (१० सप्टेंबर) भारत विरुद्ध यूएई सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे. सामना सुरु असताना कमाल तापमान ४१ डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान ३१ डिग्री सेल्सिअस राहील. हवामानामुळे खेळपट्टीवर फिरकी आणि वेगवान दोन्ही गोलंदाजांना मदत मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना आणि नंतर फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल असे म्हटले जात आहे.

गोलंदाजीला फायदा होत असल्याने टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना १८०-१९० इतका स्कोअर होऊ शकतो. खेळपट्टीवरुन फिरकीपटूंचा खेळ अवलंबून राहील. जर सामन्यादरम्यान दव असेल, तर फिरकीपटूंना फायदा होईल आणि एकाकी सामना पाहायला मिळेल. पण जर दव नसेल, तर समान लढत पाहायला मिळेल.

भारत हा आशिया कपचा गतविजेता संघ आहे. यंदाच्या सीझनमध्ये पहिल्या सामन्यात यूएईला पराभूत करुन विजयी सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दुसऱ्या बाजूला, बलाढ्य अशा भारताच्या संघाला मागे टाकत पहिला सामना जिंकण्यासाठी यूएईचा संघ प्रयत्नशील आहे. सामना सुरु होण्याआधी भारताचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोल्यात भाजपने डाव टाकला; शरद पवारांचा पक्ष फोडला, सत्ता समीकरणासाठी बहुमताचा आकडा गाठला

गोगावलेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांना आत्मसमर्पण, तुरुंगात जावं लागणार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Tourism: मुंबईपासून १४० किमी अंतरावर आहे,सुंदर हिल स्टेशन; लोणावळाही विसराल

Fack Check : सलमान खानचा MIM मध्ये प्रवेश? व्हायरल व्हिडिओने बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात खळबळ

१०८ कोटी घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, बारामतीत ईडीने टाकली धाड; घरात काय घबाड सापडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT