Hardik Pandya Asia Cup 2022 Latest Marathi Update SAAM TV
Sports

Ind Vs SL: हार्दिक, अर्शदिपने वाढवले टीम इंडियाचे टेंशन! पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत; पाहा हेल्थ अपडेट

दुखापतीमुळे कर्णधार हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांनी भारतीय संघाचे टेन्शन वाढवले ​​आहे.

Gangappa Pujari

Ind Vs SL T20 Siries: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात रोमहर्षक विजय मिळवत टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत विजय आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 2 धावांनी शानदार विजय मिळवला होता. मंगळवारी (३ जानेवारी) झालेल्या या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांनी भारतीय संघाचे टेन्शन वाढवले ​​आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या (Srilanka) टी-20 मालिकेत कर्णधार असलेला हार्दिक पांड्या पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. तर युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप हा सामन्यापूर्वीच आजारपणामुळे प्लेइंग-11 मधून बाहेर होता. त्याच्या जागी शिवम मावीला पदार्पणाची संधी मिळाली होती.

सामन्यानंतर अपडेट देताना पांड्याने स्वतः सांगितले की त्याला क्रॅम्प्स आले आहेत. नीट झोप न झाल्याने आणि पाण्याअभावीच हा प्रकार घडला आहे. आता बरे वाटत असल्याचेही पांड्याने सूचित केले आहे. म्हणजेच पुढील सामन्यात खेळण्याची आशा आहे.

अर्शदीपबाबत बीसीसीआयने त्याला ताप असून तो पूर्णपणे बरा नसल्याचे सांगितले होते. याचा अर्थ तो पुढील सामन्यातही खेळताना दिसेल. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (५ जानेवारी) पुण्यात होणार आहे.

सामन्यात झाली होती हार्दिकला दुखापत:

पहिल्या T20 सामन्याच्या 11व्या षटकात हार्दिकला दुखापत झाली होती. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या चौथ्या चेंडूवर भानुका राजपक्षेने हवेत शॉट खेळला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या हार्दिकने हा झेल सहज घेतला, मात्र यादरम्यान त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्याला क्रॅम्प्स आले. यानंतर हार्दिकला मैदानाबाहेर काढण्यात आले.

त्यानंतर उपकर्णधार सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. मात्र, नंतर पांड्या पुन्हा मैदानात आला आणि त्याने आपल्या शानदार रणनीतीने सामना जिंकला. हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) झेल घेत जखमी झाल्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. पंड्याला दुखापत कशी झाली हे यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT