Hardik Pandya Saam Tv
Sports

Ind Vs SL: मिशन श्रीलंकेसाठी 'न्यू टीम इंडिया' सज्ज, हार्दिक पांड्याने दिले नेतृत्व बदलाचे संकेत; 'या' खेळाडूंच्या कामगिरीकडे असेल लक्ष

टीम इंडियामध्ये बदलाचे संकेत असल्याचे सांगितले जात असून पुढील वर्षी होणाऱ्य टी ट्वेंटी विश्वचषकाची ही मोर्चेबांधणी असल्याची चर्चा आहे.

Gangappa Pujari

Ind Vs SL: टीम इंडियाच्या वर्षाची सुरूवात श्रीलंका विरुद्धच्या मालिकेने होणार आहे. आगामी वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका टीम इंडियासाठी महत्वाची मानली जात आहे. त्याचबरोबर कर्णधार हार्दिक पांड्यासाठीही ही मालिका नवे आव्हान असणार आहे. गेल्यावर्षी टी ट्वेंटी विश्वचषकातील लाजिरवाण्या पराभवानंतर ही पहिलीच मालिका आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या तीन टी ट्वेंटी सामन्यांमधील पहिला सामना ३ जानेवारीला मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. काही दिवसांपासून रोहित शर्माकडून टी ट्वेंटी संघाचे कर्णधार काढून घेत हार्दिक पांड्याला दिले जाणार असल्याची चर्चा रंगली होती.

या टी ट्वेंटी मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. ही विश्रांती म्हणजेच टीम इंडियामध्ये बदलाचे संकेत असल्याचे सांगितले जात असून पुढील वर्षी होणाऱ्य टी ट्वेंटी विश्वचषकाची ही मोर्चेबांधणी असल्याची चर्चा आहे. (Indian Cricket Team)

टी ट्वेंटी मालिकेसाठीचा कर्णधार हार्दिक पांड्याने याआधी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वामध्ये गुजरात संघाने आयपीएलचा किताबही पटकावला आहे. त्यामुळेच हार्दिक पांड्याकडे भविष्यात टी ट्वेंटी संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते, त्यामुळे त्याच्यासाठी ही मालिका महत्वाची ठरणार आहे.

या टी ट्वेंटी मालिकेसाठी सुर्यकुमार यादवला पहिल्यांदाच उपकर्णधारपद देण्यात आले असून त्याच्या एकदिवसीय सामन्यांमधील कामगिरीची ही पोहोचपावती आहे. त्याचसोबत ईशान किशन आणि संजू सॅमसनलाही संघात स्थान दिले आहे. आगामी टी ट्वेंटी विश्वचषक डोळ्यासमोर हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या नव्या टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. ( BCCI)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT