Ind vs Pak
Ind vs Pak Saam Tv
क्रीडा | T20 WC

Ind Vs SL: नववर्षाच्या सुरुवातीला भारत- श्रीलंका भिडणार; कधी आणि कुठे होणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ind Vs SL: बांग्लादेशचा दौरा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेने नववर्षाची सुरूवात करणार आहे. भारत आणि श्रीलंकामध्ये तीन तीन टी ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत श्रीलंकेला चारी मुंड्या चीत करत नववर्षाचा विजयाने श्रीगणेशा करण्याच्या निश्चयाने टीम इंडिया (Indian Team) मैदानात उतरेल. पाहूया भारत आणि श्रीलंका यांच्यामधील मालिकांचे संपूर्ण वेळापत्रक

भारत- श्रीलंका खेळणार तीन टी ट्वेंटी - तीन एकदिवसीय सामनेः

भारताविरुद्ध तीन टी ट्वेंटी तसेच तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा संघ भारताचा दौरा करेल. श्रीलंकेचा (Srilanka) हा दौरा तीन जानेवारीपासून सुरू होऊन पंधरा जानेवारीला संपणार आहे. यामध्ये दौऱ्याची सुरूवात तीन जानेवारीपासून टी ट्वेंटी सामन्याने होणार आहे आणि त्यानंतर एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होईल. पाहूया या सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक.

पहिला टी ट्वेंटी सामना- 3 जानेवारी 2023 - मुंबई - रात्री 7 वाजता

दुसरा टी ट्वेंटी सामना- 7 जानेवारी 2023 - पुणे- रात्री 7 वाजता

तिसरा टी ट्वेंटी सामना- 10 जानेवारी 2023 - राजकोट- रात्री 7 वाजता

एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रकः

टी ट्वेंटी सामने खेळताच भारत आणि श्रीलंकेमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. ही एकदिवसीय मालिका १० जानेवारीपासून सुरू होईल. पाहूया या सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक.

पहिला एकदिवसीय सामना- 10 जानेवारी 2023 - गुवाहाटी- दुपारी 1.30 वाजता

दुसरा एकदिवसीय सामना- 12 जानेवारी 2023 - कोलकत्ता- दुपारी 1.30 वाजता

तिसरा एकदिवसीय सामना- 15 जानेवारी 2023 - तिरुवनंतपुरम - दुपारी 1.30 वाजता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Special Recipes : जेवणासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन! घरीच बनवा दही मिरची, जाणून घ्या रेसिपी

Famous Monsoon Place In Thane: पर्यटकांना भुरळ घालणारे ठाण्यातील येऊर हिल्स, निसर्गरम्य दृश्य पाहून प्रेमात पडाल!

Black Coffee for Weightloss: वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी ठरेल रामबाण; 'या' पद्धतीनं करा सेवन

Maharashtra Live News Updates : दिल्लीत काँग्रेसची खलबतं, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक

Amarnath Yatra 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, अमरनाथ यात्रा तातडीने थांबवली; महामार्ग पडले बंद

SCROLL FOR NEXT