Suryakumar Yadav SAAM TV
Sports

Ind Vs SL ODI Series: खोऱ्याने धावा, जबरदस्त फॉर्म, तरीही सुर्यकुमार ODI मालिकेतून बाहेर, काय आहे कारण?

सुर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून प्रत्येक सामन्यांत धावांचा पाऊस पडताना दिसत आहे असे असले तरी, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी देण्यात आली नाही.

Gangappa Pujari

Ind Vs SL ODI Siries: भारत आणि श्रीलंका यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना आजपासून गुवाहाटीमध्ये रंगणार आहे. याआधी भारतीय संघाने तीन टी ट्वेंटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली होती. यामध्ये शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात सुर्यकुमार यादवच्या वादळी शतकाच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला.

सध्या सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून प्रत्येक सामन्यांत धावांचा पाऊस पडताना दिसत आहे असे असले तरी, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी देण्यात आली नाही, त्याच्याजागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. काय आहे यामागचे कारण, चला जाणून घेवू.

गुवाहाटी वनडेमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादवचीही निवड झाली नाही. गुवाहाटी एकदिवसीय सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली तेव्हा त्यात सूर्यकुमार यादव नव्हता. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संघात पसंती देण्यात आली. सूर्यकुमार यादवचा फॉर्म इतका चांगला आहे आणि गेल्या सामन्यात शतक झळकावून त्याने टीम इंडियाला टी-20 मालिका जिंकून दिली, त्याला का वगळण्यात आले? याचे कारण जाणून घेवू.

सूर्यकुमारचा खराब वनडे फॉर्म:

सूर्यकुमार टी-20 फॉरमॅटमध्ये नंबर 1 फलंदाज असून यामध्ये तो धावांचा पाऊस पाडत असला, तरी वनडेमध्ये त्याची कामगिरी काही खास नाही. गेल्या वर्षी, सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 च्या सरासरीने 260 धावा केल्या होत्या आणि त्याला फक्त एक अर्धशतक झळकावता आले होते. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने ५५ पेक्षा जास्त सरासरीने ७२४ धावा केल्या होत्या, त्यामुळेच त्याला संघात संधी देण्यात आली आहे.

वनडे मालिकेत केएल राहुल पूर्वी ओपनिंग करायचा पण श्रीलंकेविरुद्ध (Srilanka ) वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडिया त्याला मधल्या फळीत संधी देत ​​आहे. राहुल चौथ्या क्रमांकावर यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळत आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमधील स्थान टिकवणे कठीण झाले आहे. सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT