india vs srilanka match result  twitter
क्रीडा

India vs Srilanka Match Result: नाद करा पण आमचा कुठं! लंकेची विजयी मालिका मोडत टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

India vs Srilanka Match Highlights: भारतीय संघाने या सामन्यात जोरदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

India vs Srilanka Match Highlights:

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील सुपर ४ सामना पार पडला. या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने ४१ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर दबाव बनवून ठेवला होता.

मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीतील स्थान देखील निश्चित केलं आहे.

भारतीय संघाने दिलं २१४ धावांचं आव्हान..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डावाची सुरुवात करताना शुबमन गिल स्वस्तात माघारी परतला. तर कर्णधार रोहित शर्माने एकाकी झुंज देत ५३ धावांची खेळी केली.

या खेळी दरम्यान ७ चौकार आणि २ षटकार मारले. तर केएल राहुलने ३९ आणि ईशान किशनने ३३ धावांची खेळी केली. शेवटी अक्षर पटेलने २६ धावांची बहुमूल्य खेळी करत भारतीय संघाची धावसंख्या ४९.१ षटकात २१३ धावांपर्यंत पोहचवली. (Latest sports updates)

लंकेचा विजयरथ थांबला...

या सामन्यात श्रीलंकेला विजय मिळवण्यासाठी २१४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव देखील डगमगला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट्स घेत सामन्यात दबदबा बनवून ठेवला. शेवटी गोलंदाजीत नडणारा वेलालागे फलंदाजी करतानाही भारतीय संघाला नडला.

वेलालागे आणि धनंजय डी सिल्वाने अर्धशतकी भागीदारी करत श्रीलंकेला या सामन्यात जिवंत ठेवलं होतं. धनंजय डी सिल्वा ४१ धावा करत माघारी परतल्यानंतर भारतीय फॅन्सच्या जीवात जीव आला. मात्र वेलालागे फेविकॉलसारखा चिपकुन राहिला.

त्याने ५ गडी बाद करण्यासह नाबाद ४२ धावांची खेळी केली. मात्र श्रीलंकेचा संघ विजयापासून ४१ धावा दूर राहिला. यासह भारताने अंतिम फेरीतील स्थान जवळ जवळ निश्चित केलं आहे. तर श्रीलंकेचा विजयी रथ थांबला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT